अकोला:- जिल्हा मराठा मंडळाची आमसभा संपन्न जिल्हा मराठा मंडळाने यापुढे सौर ऊर्जा वापराचा संकल्प केला आहे ही प्रेरणादायी बाब आहे. मंडळाने सौर ऊर्जा संदेश घरोघरी पोहचवला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वीज उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.
अकोला जिल्हा मराठा मंडळाची आमसभा डॉ.रणजीत सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. याप्रसंगी खासदार अनुप धोत्रे यांनी आम सभेत संबोधित केले व पुढील आमसभेला सभासदांनी आपल्या कुटुंबातील तरुण कार्यकर्ता घेऊन येण्याचे आवाहन केले.
अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.संतोषदादा कोरपे , आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार वसंतराव खोटरे,मंडळाचे माजी अध्यक्ष महादेवराव भुईभार, सचिव प्रकाश पाटील,कोषाध्यक्ष डॉ. विनोद बोर्डे,सदस्य सर्वश्री शिवाजीराव देशमुख,प्रा.विवेक हिवरे, श्रीकांत पाटील, दिवाकर पाटील,दीपक आखरे, श्रीधरराव पागृत, डॉ. अशोक बिहाडे यांची विचारपीठावर उपस्थिती होती.
आमसभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या फोटोचे पूजनाने अभिवादन करून झाली.
याप्रसंगी मंडळाचे वतीने नवनियुक्त खासदार अनुपदादा धोत्रे व अकोला जनता बँकेच्या संचालकपदी सलग सहाव्यांदा निवड झाल्याबद्दल संतोष गोळे यांचा मंडळाचे अध्यक्ष डॉ.रणजीत सपकाळ यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.याप्रसंगी मंडळाच्या स्थापनेपासून तर आज पर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणारी चित्रफीत दाखवण्यात आली.मराठा मंडळ परिवारातील मृत्यू पावलेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मंडळाचे सचिव प्रकाश पाटील यांनी मागील आमसभेचे व संस्थेच्या मागील वर्षाचा लेखाजोखा अहवाल वाचन केले.कोषाध्यक्ष डॉ. विनोद बोर्डे यांनी जमा खर्च पत्रक सादर केले.
अकोला जिल्हा मराठा मंडळाचे अध्यक्ष डाॅ. रणजीत सपकाळ
अध्यक्षीय भाषणात म्हणाले की मराठा मंडळाला शंभर वर्षे पूर्ण झाले असून दहा फेब्रुवारी 2024 रोजी आपण मोठ्या उत्साहाने शताब्दी समारोह साजरा केला.मंडळाचे संस्थापक स्व. नामदेवराव पोहरे, स्व. रामभाऊ सातारकर, स्व. भालचंद्र खेळकर, स्व. श्रीधरराव सपकाळ, स्व. मोतीरामजी म्हैसणे, स्व. संभाजी भोजने,स्व. पुंडलिकराव पाटील, स्व. डॉ. अण्णासाहेब कोरपे ,डॉ. कुसुमताई कोरपे यांच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.तसेच स्व. भीमरावजी धोत्रे, महादेवराव भुईभार, दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांच्याही अनमोल योगदानाचा उल्लेख याप्रसंगी केला.एखाद्या संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होणे आणि ती संस्था 100 वर्षानंतरही उत्कृष्टपणे कार्यरत असणे याचे सर्व श्रेय मंडळ स्थापन झाल्यानंतर समाजातील ज्या ज्या आदरणीय मंडळींनी आजपर्यंत मंडळाची धुरा सांभाळली,आपले बहुमोल योगदान दिले त्या संस्थेच्या सर्व मंडळींना जाते.त्यांच्या या योगदानामुळेच मंडळ शतकपूर्ती करू शकले. या प्रसंगी त्यांनी दहा वर्षे अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर टाकून जो विश्वास सभासदांनी दाखविला त्याबद्दल सर्व सभासदांचे मनोमन आभार मानले.
आमदार रणधीर सावरकर आपल्या भाषणात म्हणाले की ज्या उदात्ते हेतूने मंडळाची स्थापना झाली तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मंडळ आजही कार्य करीत आहे. गेल्या दहा वर्षापासून मंडळाने अनेक समाज उपयोगी कार्य करून आपले सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक योगदान दिले आहे. मंडळाने समाजासाठी उत्कृष्ट असे आधुनिक सभागृह निर्माण केले असून त्याचा लाभ सर्व बहुजनांना होत असल्याचे गौरवोद्गार काढले
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.संतोष दादा कोरपे
आमसभेस संबोधित करतांना म्हणाले की मंडळाचा विकास करण्यासाठी अनेक लोकांनी आपले योगदान दिले. मंडळाचा वाढलेला विस्तार, मंडळाचा आवाका ,मंडळाची वाटचाल बघता आणखी प्रगतीचे शीखर गाठावे.मंडळांने ग्रामीण भागातील लोकांचे,शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ.सपकाळ साहेबांनी अतिशय उत्कृष्टपणे दहा वर्षे मंडळाचा कारभार केला असून यापुढेही संचालक मंडळ असेच कार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त केली .
या आमसभेत वर्तमान कार्यकारिणीचा कालावधी संपल्यामुळे नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली.त्या समितीच्या अध्यक्षस्थानी डॉ. संतोष दादा कोरपे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेत मंडळाचे सचिव श्री प्रकाश ज्ञानदेवराव पाटील यांची नवीन अध्यक्ष म्हणून एकमताने निवड केली.
मंडळाचे संचालक मंडळ निवडण्याचे अधिकार अध्यक्षांना बहाल करण्यात आले.
नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश पाटील यांचा सर्वश्री डॉ. संतोषदादा कोरपे ,आमदार रणधीर सावरकर ,खासदार अनुपदादा धोत्रे, माजी आमदार वसंतराव खोटरे यांचे हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
अकोला जिल्हा मराठा मंडळाचे नवनियुक्त संचालक मंडळ
अध्यक्ष- प्रकाश ज्ञानदेवराव पाटील उपाध्यक्ष-दिवाकर सुखदेवराव. पाटील
सचिव- प्रा.विवेक हरिभाऊ हिवरे
कोषाध्यक्ष-डाॅ.विनोदमधुकरराव बोर्डे सहसचिव- श्रीकांत ओंकारराव पागृत सदस्य- अनिल शंकरराव राऊत, संजय जगन्नाथ सरप, डॉ. विनित विश्वासराव हिंगणकर, पंकज बाबुराव देशमुख,निलेश बाबुराव पाचडे, डॉ.निखिल प्रमोद बोर्डे
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी एका कार्यकर्त्यांच्या खांद्यावर आपण फार मोठी जबाबदारी टाकली आहे. आपल्या सर्वांच्या ऋणात राहून आपण टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे भावपूर्ण प्रतिपादन केले.
आमसभेला मराठा मंडळाचे आजीव सभासद व मराठा बांधव भगिनी युवा वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. विवेक हिवरे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....