गडचिरोली हा नक्षलग्रस्त आदिवासी उद्योग विरहित मागासलेला जिल्हा असून या जिल्ह्यात अनेक सुशिक्षित बेरोजगार हे डीएड बीएड करून अनेक दिवसापासून रिकामे आहेत अशाच युवकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत घेण्यात यावे अशा मागणी चे निवेदन आरमोरी तहसीलदार मार्फत डीएड बीएड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांना पाठवलेले आहे सविस्तर वृत्त असे की गडचिरोली जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांचे पदे रिक्त असून अजूनही ती रिक्त पदे भरण्यात आलेली नाही परंतु राज्य शासनाने मागील काही दिवसात सदर रिक्त पदावर जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्या शिक्षकांना शिकवण्यासाठी आवेदन पत्र मागविले आहेत जे 58 वर्षे नोकरी केले काही 58 वर्षे नोकरी करून सेवानिवृत्त झाले आणि त्यांना आजतागायत त्यांची वय ही 60 ,62, 65 वर्षापर्यंत झाली आहे अशाही लोकांना शिक्षण विभागाने व राज्य शासनाने पूर्ववत शिकविण्याकरीता आवेदन अर्ज मागविले ही बाब उचित नसल्याने बारावीनंतर डीएड आणि बीएड व पदव्युत्तर शिक्षण घेऊन अनेक बेरोजगार युवक ,युवती हे गडचिरोली जिल्ह्यातले रिकामे आहेत परंतु नोकरी नसल्याने सुशिक्षित बेरोजगार म्हणून जीवन जगत आहेत अशाच महाराष्ट्र शासनाने जे रिक्त पद आहे त्या रिक्त पदावर सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्याचा जो आदेश काढलेला आहे तो आदेश बदलवून जे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार डिएड ,बीएड, पदव्युत्तर आहेत अशाच युवकांना,युवतींना गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक पदावर भरती करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे आरमोरी विधानसभा चे माजी आमदार श्री आनंदरावजी गेडाम यांच्या नेतृत्वात शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई श्री गिरीश महाजन यांना दिले आहे सदर निवेदन हे आरमोरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांना काँग्रेसचे माजी आमदार आनंदरावजी गेडाम यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते ,प्रेमचंद निकुरे , सौ सोनू प्रमोद लिंगायत, फाल्गुन फकीरा नरुले ,आसु सुरेंद्र वाघ ,भूमेश्वर खेवले ,प्रफुल भांडेकर, निलेश शेंडे ,रुपेश सोरते ,भीमराव वाढई,बलराज ,मिसार ,,रूमाजी अंडेल ओमप्रकाश मडावी, श्वेता वाघाडे ,हेमचंद जनबंधू ,भगवान मंगरे निलेश भोवते ,खुशाल ढोरे ,प्रकाश सहारे सुषमा खोब्रागडे ,गिरीश मगरे, तेजराव कांबळे ,सिद्धार्थ रामटेके आदी धारक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते