वाशिम - आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्याच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असणारी जिल्ह्यातील सर्वपुर सुपरीचित असलेली शैक्षणिक संस्था कानडे इंटरनॅशनल स्कुल ला सिबिएसई बोर्ड दिल्ली मंडळाची मान्यता प्राप्त झाली असुन कानडे इंटरनॅशनल स्कुल ही यवतमाळ, अकोला, बुलढाणा व तसेच वाशिम या सर्व जिल्ह्यामधुन एकाच प्रयत्नात इयत्ता १ ते इयत्ता १२ वी म्हणजेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरापर्यंत सिबिएसई मंडळाची मान्यता मिळवणारी एकमेव शाळा ठरली आहे.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा वसा आपल्या हाती घेऊन जिल्ह्यातील सुपसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. विजय कानडे व त्यांच्या पत्नी सौ. ज्योती कानडे यांनी ग्रामीण व शहरी मुलांना शिक्षणाची दारे उघडी करत कानडे इंटरनॅशनल स्कुल ची स्थापना सन २०१८ या वर्षी केली.
जवळपास चार एकर क्षेत्रफळ असलेल्या या शाळेची भव्य आणि सुसज्ज अशी इमारत बघावयास मिळते. विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान त्याच प्रमाणे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा वर्गखोल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुले व मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि विशेष म्हणजे शारीरीकरीत्या अपंग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशा रॅम्प ची तसेच (सीडब्ल्युएसएन) प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना विविध विषयातील प्रात्यक्षिके व प्रयोग करण्यासाठी सुसज्ज अशा गणित, संगणक, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जिवशास्त्र यांच्या स्वतंत्र प्रयोगशाळा व तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जिवशास्त्र यांची एक सामायिक प्रयोगशाळा उपलब्ध करण्यात आली आहे. शैक्षणिक विकासाबरोबरच क्रिडा क्षेत्रा मध्ये देखील कानडे इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विभागीय, राज्यस्तरीय खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त करून शाळेचे व तसेच पालकांचे नावलौकिक केले आहे.
याचबरोबर विद्यार्थ्यांना वाचनाची रुची निर्माण व्हावी या करीता शाळेत ग्रंथालय निर्माण करण्यात आले आहे. जिथे जवळपास विविध विषयांची ३५०० ते ४००० पुस्तके उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे हिंदी, मराठी, सामाजीक शास्त्र प्रयोगशाळा व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ’आर्ट एन्ड क्राफ्ट रूम’ अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेले सभागृह देखील आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात दर्जेदार शिक्षण सिबिएसई मंडळाकडुन अभ्यासक्रम तयार करण्यात येतो. जेईई, नीट या सारख्या परीक्षांना समोर ठेवुन अभ्यासक्रमांची रचना करण्यात येते. यामुळे कानडे इंटरनॅशनल स्कुल ने इयत्ता १ ते इयत्ता १२ पर्यंत सिबिएसई मंडळाची मान्यता मिळवून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
माता सावित्री यांच्या कार्याने प्रेरीत होवुन शाळेच्या संचालिका सौ. ज्योती विजय कानडे यांनी कानडे इंटरनॅशनल स्कुलची धुरा अत्यंत प्रभावीपणे सांभाळत शाळेस सिबीएसई मान्यता मिळवुन शाळेचा नावलौकीक दिल्ली पर्यंत नेण्याचा बहुमान मिळवला आहे. येणार्या काळात कानडे इंटरनॅशनल स्कुल यशाचा एक नविन अध्याय निर्माण करेल यात शंका नाही. सिबीएसई मंडळाची मान्यता प्राप्त करण्यासाठी डॉ. विजय कानडे सर व सौ. ज्योती कानडे यांच्या सोबतच कानडे इंटरनॅशनल स्कुल चे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कठोर परीश्रम घेउन या यशात आपला सहभाग नोंदविला असुन पालकांनी देखील या यशाबद्दल शाळा प्रशासनाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....