कारंजा लाड --
राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असतांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत रचनात्मक व विधायक काम करण्याची हातोटी विलक्षण आनंद देऊन जाते.त्या साठी आवश्यक असते ती माणसे जोडण्याची कला आणि ही कला प्रत्येकालाच अवगत असते असे नाही.परंतु अँड संदेश जिंतुरकर यांनी हि कला अवगत केली. व विशेषतः जीवाभावाची माणसं जोडली.असे प्रतिपादन शिवसेना नेते अनिल राठोड [उ.बा.ठा.] केले.
स्थानिक श्री कामक्षा माता मंदिर सभागृहात वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक अँड.संदेश जैन जिंतुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केलं. पुढे बोलतांना अनिल भाऊ म्हणाले की, मी अँड संदेश यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्य अगदी जवळून पाहिले आहे. युवक काँग्रेस अध्यक्ष असतांना अँड संदेश यांनी केलेले कार्य अजुनही स्मरणात आहे, उच्च शिक्षित, आंतरव्यक्ती संबंध जोपासणारे, शांत, प्रेमळ व मनमिळाऊ असलेले सहसा कोणत्याही वादात न पडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून अँड संदेश यांची ख्याती आहे. याच सकारात्मक आणि कृतिशील वृत्तीव्दारे संदेश जिंतुरकर कायम इतरांच्या मनामध्ये स्थान मिळविण्यास यशस्वी झाले आहेत.म्हणूनच अँड संदेश यांच्या प्रेमापोटी आम्ही संदेश यांना आशिर्वाद देण्यासाठी आवर्जुन उपस्थित राहिलो असे प्रांजळ मत संदेश जिंतुरकर यांचे अभिष्टचिंतन व्यक्त करतांना शिवसेना नेते अनिलभाऊ राठोड व मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय रोठे यांनी व्यक्त केले.
दरवर्षी प्रमाणे यंदाही संदेश जिंतुरकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना, सर्व धर्म मित्र मंडळ च्या वैद्यकीय साहित्य सेवा बॅकचे संस्थापक शाम सवाई यांच्या माध्यमातून वाॅकरचे वाटप करून दिव्यांगांना आधार देण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं. तीन चार वर्षांपासून संदेश जिंतुरकर हे आपल्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना तीन चाकी वाहन, कुबड्याचे वाटप करीत आहे.
यावेळी विदर्भ लोककलावंत संघटना,आदर्श जयभारत बहुद्देशीय संस्था व ईरो फिल्म्स एण्टरटेन्मेंटचे डाॅ ज्ञानेश्वर गरड, ईम्तियाज लुलानिया, रोमील लाठीया , राहुल सावंत, विजय राठोड यांनी उत्कृष्ट अश्या श्रावणधारा संगीत रजनी या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते.
यावेळी विदर्भ लोक कलावंत संघटनेचे संजय कडोळे, हभप लोमेश पाटिल चौधरी , अखिल भारतीय नाट्य परिषद नियामक मंडळ मुंबईचे सदस्य नंदकिशोर कव्हळकर, अ भा मराठी नाट्य परिषद कारंजा शाखेचे संस्थापकिय सदस्य शाहीर देवमण मोरे,संजय मालवे कारंजा लाड शहर भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष प्रदिप राऊत , शिवसेना शहर प्रमुख गणेश भाऊ बाबरे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमीर खान पठाण , एन एस यु आय चे वाशिम जिल्हा उपाध्यक्ष अक्षय बनसोड, माजी नगरसेवक प्रसन्ना आग्रेकर, माजी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष इमरान शेख, नदीम खान, तौसिफ खान सरफराज खांन, अताऊल्ला खांन , युवा सेने चे शाम पावडे, रवि पंजवाणी, कादर खान, श्री संत गाडगेबाबा विचार मंच चे संतोष धोंडगे, सुनील फुलारी , विजय भड, रामबकस ढेंडुळे, अमोल लुलेकर, डाॅ अतुल वानखडे, प्रा.स्वप्नील भगत , ज्ञानेश्वर घुडे, उमेश माहितकर, सुमीत भगत, उमेश अनसाने,गोपी ढेंडुळे , राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष सुभानभाई कामनवाले, प्रज्वल गुलालकरी, देवराव जामनिक जफर खान,सास टिम चे दिपक सोनोने, हर्षल रामटेके, सुरेश कवळे , फिरोज रेघीवाले यांच्या सह अनेक मित्र मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शाम सवाई यांनी केले तर आशिष बंड जैन यांचे यावेळी विशेष सहकार्य लाभले
आपल्या प्रतिक्रिया द्या....