अकोला - अकोला येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रमात आदर्श प्रचारकरत्न ध्यान, प्रार्थना, ग्रामगीतेचे निष्ठावंत उपासक,कादंबरीकार पुष्पराज व उद्धवराव गावंडे यांचे वडील गुरूदेव निवासी पुजनिय काशिरामजी गावंडे काका यांचा ९४ वा जयंती महोत्सव सामुदायिक प्रार्थना,चिंतन आदरांजली प्रतिमा पुजन महाआरती जयघोष घेऊन दि.३० जानेवारी रोजी साजरा करण्यात आला.
स्मृतिदिनानिमित्त गांवडे प्रतिष्ठाणाच्या वतीने आदर्शप्रचारक पुरस्कार वितरण सोहळा दि.१२फेब्रुवारी रोजी स.११वा .अ.भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे गुरूकुंज आश्रमचे मुख्यसर्वाधिकारी सन्मा लक्ष्मणराव गमे यांचे हस्ते त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आदर्श प्रचारक भानुदास कराळे, गोवर्धनजी खवले, आर आय शेख गुरूजी यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.अशी घोषणा प्रतिष्ठानचे वतीने उद्धवराव गांवडे यांनी केली.या प्रसंगी पुष्पराज गावंडे यांची सुध्दा प्रमुख उपस्थिती होती.स्व.काशीरामजी गावंडे यांनी बहिरखेड येथे सुरू केलेला ग्रामजंयती उत्सव यावर्षी एप्रिल महिण्यात भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्यात येईल असे नितिनजी गांवडे यांनी जाहीर केले.आभार प्रदर्शन भानुदास कराळे यांनी केले.