{जिल्ह्यातील 10 शाळेमध्ये सदर बस प्रदर्शनीचे आयोजन,विद्यार्थ्यांना मिळणार अंतराळ विज्ञान पाहण्याचा आनंद,विज्ञान भारती,शिक्षण विभाग,विज्ञान अध्यापक मंडळ व मुख्याध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजन}
कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ,नागपुर,माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद वाशिम,विज्ञान अध्यापक मंडळ व मुख्याध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने वाशिम जिल्ह्यामध्ये इस्त्रोचे विज्ञान व तंत्रज्ञान असलेली फिरती बस विज्ञानाचा प्रचार व प्रसार प्रदर्शनद्वारे करण्यासाठी सदर बस आपल्या जिल्ह्यात दिनांक 01 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2023 पर्यंत प्रदर्शनाकरिता उपलब्ध राहणार आहे.
सदर बस विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ नागपूर यांनी इस्त्रो ची बस उपलब्ध करून दिली आहे.आपल्यापासुन अंतराळ लक्षावधी किलो मीटर अंतरावर असुनही जमिनीवरुन दिसणारे चंद्र ,सुर्य,ग्रह,असंख्य तारे आणि एकूणच अंतराळाचे कुतूहल कायम राहिले आहे. अंतराळ प्रवासाची परिपूर्ण माहिती सर्व सामान्य नागरीकांसह विद्यार्थ्यांना व्हावी ह्या एकमेव उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ने SPACE ON WHEELS ही अनोखी फिरती बस तयार केली आहे. सदर बसमध्ये चंद्रयान मोहिम, मंगळयान मोहिम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसेच इस्त्रोचा आता पर्यंतचा अंतराळ प्रवास विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व समस्त जिल्हा वासीयाना पहायला मिळणार आहे. यामध्ये विज्ञान भारती अंतर्गत विविध स्पर्धा, व्याख्याने, अंतराळ सफर, फिल्म इत्यादी बसमध्ये आकर्षण राहणार आहे. खालील शाळानी वेळापत्रका प्रमाणे तारखेनुसार इस्रो बसचे नियोजन केलेले आहे. 1 डिसेंबर रोजी
लक्ष्मीचंद विद्यालय सेलुबाजार येथे सकाळी साडेसात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आयोजित केली आहे.
2 डिसेंबर रोजी
विद्याभारती कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, कारंजा, 3 डिसेंबर रोजी
एल एस पी एम हायस्कूल, धामनी, मानोरा, 4 डिसेंबर रोजी श्री. धानोरकर आदर्श विद्यालय, धानोरा ता. मंगरूळपीर, 5 डिसेंबर रोजी आप्पास्वामी विद्यालय शेंदुजना अढाव ता. मानोरा, 6 डिसेंबर रोजी जिजामाता विद्यालय अनसिंग ता. वाशिम, 7 डिसेंबर रोजी हॅपी फेसेस स्कूल, वाशिम, 8 डिसेंबर रोजी
विदर्भ पब्लिक स्कूल मालेगाव, 9 डिसेंबर रोजी श्री शिवाजी विद्यालय रिठद तर 10 डिसेंबर रोजी भारत माध्यमिक विद्यालय रिसोड येथे समारोप होईल.
इस्त्रोची बस वरील सर्व शाळेमध्ये सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत प्रदर्शनासाठी उपलब्ध राहील.
वाशिम जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सदर प्रदर्शनी दाखवण्यासाठी नियोजन करावे,असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे,उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे, इस्त्रो बसचे समन्वय ललित भुरे व विजय भड यांनी केले आहे. असे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांना मिळाल्याचे त्यांनी कळवीले आहे.