आज दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी बँकेला 116 वर्ष पूर्ण झाले असता बँकेच्या वर्धापन दिनानिमित्ताने व आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये ग्राहक मेळाव्याचे आयोजन बँकेच्या वतीने करण्यात आले होते सदर मेळाव्यामध्ये बँकेच्या परिसरातील शेतकरी तसेच कर्मचारी व्यावसायिक बांधवांच्या आर्थिक उन्नती करिता त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्या करिता बँकेने विविध कर्ज योजना आणल्या आहेत शेतकरी बांधवांसाठी जलसिंचन करिता फक्त सहा टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिले आहे तसेच शेती उपयोगी विविध अवजारे ट्रॅक्टर जेसीबी पोकलँड इत्यादी करिता अल्प व्याजदरावर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे तसेच कर्मचारी वर्गाकरिता गृह कर्ज सोलार कर्ज वैयक्तिक कर्ज वाहन कर्ज व व्यावसायिक बांधवांसाठी व्यवसायाकरिता कॅश क्रेडिट कर्ज भांडवली कर्ज अल्पमुदती व दीर्घ मुदती टर्म लोन सोलार कर्ज सोनेतारण कर्ज अल्प व्याज दरावर उपलब्ध करून दिले आहे आजच्या काळामध्ये सर्वत्र डिजिटलायझेशन झालेले असून बँकिंग व्यवहार सुद्धा डिजिटल पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत डिजिटल व्यवहार करत असताना आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सावधान असणे गरजेचे आहे आपले डिजिटल व्यवहार करीत असताना आपली गोपनीय माहिती बँक कधीही कुणालाही विचारात नाही त्यामुळे बँकेच्या नावाने आलेले फसवे मेसेज फसवे फोन कॉल यापासून सावधान राहणे गरजेचे आहे या सर्व बाबींची माहिती ग्राहकांना व्हावी याकरिता आज रोजी ग्राहक मेळाव्याचे आयोजन बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये करण्यात आले होते
सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून बँकेचे संचालक माननीय दिलीपरावजी जाधव हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे माजी संचालक श्री प्रकाशराव कुटे बाजार समितीचे सभापती श्री गणेशराव उंडाळ जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक अनिल जाधव श्री नाना मुंदडा कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष काळे सर ह भ प श्री मुंडे गुरुजी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव धाबे श्री चंद्रकांत गायकवाड श्री संपतराव शिंदे श्री राजीव पाटील गीद श्री सुभाषराव घुगे श्री नंदकिशोर नवघरे श्री संपतराव शिंदे यांची उपस्थिती होती
प्रमुख पाहुणे म्हणून श्री काळे सर यांनी बँक राबवित असलेल्या कर्ज योजना व विमा योजना ही कर्मचाऱ्यांसाठी खूप लाभदायी असल्याचे प्रतिपादन केले जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्मचाऱ्यांकरिता तीस लाख रुपये ची विमा सुरक्षा कवच उपलब्ध करून दिले आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा अनपेक्षित पणे अपघाताने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास तीस लाख रुपयांची मदत जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत केली जाते सदर विमा योजना महाराष्ट्र मध्ये फक्त अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये उपलब्ध करून दिली आहे सदर बॅंकेची सेवा सुविधा व सुरक्षितता वाखाणण्यासारखी असल्याचे प्रतिपादन श्री काळे सर यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील कुटे यांनी बँक 116 व्या वर्षाचा वर्धापन दिन साजरा करीत असताना शेतकऱ्यांप्रती असलेली बँकेची बांधिलकी शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीसाठी सतत नवनवीन योजना आणून शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचे अविरतपणे काम माननीय अध्यक्ष डॉक्टर संतोष कुमार कोरपे व माननीय संचालक बोर्ड करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले
अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यमान संचालक माननीय दिलीपरावजी जाधव यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शेतकऱ्यांकरिता सहा टक्के व्याजदरावर सुरू केलेले जलसिंचन कर्ज तसेच शेती उपयोगी इतर कर्ज घेऊन आपली शेती प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन करण्याचे आव्हान केले आहे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये कर्मचारी वर्गाकरिता विविध कर्ज योजना तसेच व्यावसायिक वर्गा करिता सुद्धा विविध कर्ज योजना बँकेने आणलेल्या असून सदर योजनेचा लाभ मालेगाव तालुक्यातील कर्मचारी व व्यावसायिकांनी घेण्याचे आव्हान केले आहे बँकेने सुरू केलेल्या डिजिटलच्या सर्व सेवा सुविधा यांचा वापर ग्राहकांनी करावा सदर सुविधा या पूर्ण सुरक्षित असून सुरक्षे संबंधी बँकेने भक्कम उपाय योजना केल्या आहेत असे त्यांनी सांगितले
तसेच बँकेशी जुळलेला शेतकरी,कर्मचारी, व्यावसायिक वर्ग यांनी आपला प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढून आपले नंतर आपल्या कुटुंबाला सुरक्षित करावे व प्रत्येक पात्र ग्राहकांनी विमा काढण्याचे आवाहन माननीय संचालक महोदयांनी केले.
शेती कर्ज घेत असताना प्रत्येक शेतकऱ्याला सदर विम्याचा लाभ होण्याचे दृष्टिकोनामधून कर्जवाटप करत असताना सर्व शेतकरी बांधवांनी सदर विम्याचे फॉर्म आपल्या सचिवांजवळ देण्याचे आव्हान माननीय दिलीपराव जाधव यांनी केले आहे अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील सर्वात पहिली बँक असून बँकेने 116 वर्षापासून तत्पर सेवा देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे ग्राहकांनी दाखवलेल्या या विश्वासास कधी तडा जाणार नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच ग्राहकांच्या आर्थिक उन्नती करिता कटीबद्ध आहे शेतकऱ्यांनी आपल्याकडील पीक कर्जाचा नियमित कर्ज भरणा करून शून्य टक्के व्याजदराचा लाभ घेण्याचे आव्हान माननीय संचालक महोदयांनी केले आहे सदर कार्यक्रमास मालेगाव तालुक्यातील प्रतिष्ठित शेतकरी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थांचे पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी व मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची उपस्थिती होती
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री तलवारे यांनी केले व बँकेच्या विविध कर्ज योजनेची माहिती मार्केटीग अधिकारी श्री देवानंद सुर्वे यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुमित मोहोळ यांनी केले मालेगाव शाखेचे पालक शाखाधिकारी श्री दत्तात्रय चौधरी यांनी आभार प्रदर्शन करत असताना बँकेने नव्यानेच मालेगाव शाखेमध्ये सर्व ग्राहकांकरिता सोनेतारण कर्ज, इलेक्ट्रिक वाहन खरेदी करिता कर्ज, सोलार कर्ज, गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज योजना बँकेने चालू केली असून पात्र व गरजू ग्राहकांनी सदर योजनेबाबत शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे सदर कार्यक्रमांमध्ये उपस्थित शेतकरी कर्मचारी पतसंस्थांचे पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी बँक अधिकारी व कर्मचारी तसेच सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे व अध्यक्ष महोदय यांचे आपला अमूल्य वेळ काढून बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ग्राहक मेळाव्यास उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे . सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता बँकेचे कर्मचारी श्री निखिल राठोड, सौ शिल्पा निकस, श्री निखिल ठाकरे श्री केशव घुगे कु अश्विनी आढे उमेश कुटे विनोद ढोकणे व निरीक्षक श्री भटकर श्री गोटे व सर्व सचिव मंडळींनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली सदर ग्राहक मेळाव्यास परिसरातील ग्राहकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.