कारंजा :
संपूर्ण वाशिम जिल्ह्यात झालेल्या गत दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या फळबाग व भाजीपाला पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे,त्या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे सरसकट पंचनामे करून त्वरित आर्थिक देण्याची मागणी वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे दि.२९ नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे कारंजा तहसीलदार यांचे मार्फत वाशिम जिल्हाधिकारी यांना मागणी करण्यात आली आहे,दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे "वाशिम जिल्ह्यात मागील २ दिवसापासून सतत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटमुळे शेतकऱ्यांच्या फळबाग व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.जिल्ह्यातील बऱ्याच महसुल मंडळात अवकाळी पाऊसासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबाग व भाजीपाला पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे,शेतकऱ्यांच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीचा विचार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे अत्यंत आवश्यक असून अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचे सरसगट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आरोग्य मदत देण्यात यावी."अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली आहे.यावेळी राकापा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र घुले,कारंजा तालुकाध्यक्ष अमोल ठाकरे,शहराध्यक्ष अजय श्रीवास,जिप सभापती अशोक डोंगरदिवे, जिप सदस्य चंद्रकांत डोईफोडे,संजय कोकरे,संजय राठोड,नगरसेवक नितीन गढवाले,वीरेंद्र चारथळ,साहेबराव तुमसरे,हुसेन बंदुकवाले,अमोल गाडे, जाकीर शेख, प्रसन्ना पळसकर,सलीम गारवे,सलीम प्यारेवाले,चांद मुन्नीवाले,अ एजाज,अ रशीद,कृष्णा देशमुख, रज्जाक फकिरवाले,रज्जाक खेतिवाले,फारुख मोहम्मद शेख,फारूक अली,मो अकबर ,समिरोद्दीन,तस्लिम रेघिवाले,शेख अलीम,जुम्मा रेघिवाले,इमाम भवाणीवाले,अनवर प्यारेवाले, विश्वास घुले,राहुल राठोड,ज्ञानेश्वर राठोड,अलीमोद्दीन पिंट्या भाई,उस्मान खान,मुन्नाभाई ठेकेदार, समिउल्लाह ठेकेदार, अ मोहसीन,अजय घोडेस्वार, दीपक काळे,अंकुश जोशी,बाबुराव चौधरी,उकंडा राठोड,नितीन पाटील उपाध्ये,अ कय्युम जट्टावाले,अमीन पप्पूवाले,अमोल भिंगारे,नरेंद्र पायघन,अजय डोंगरदिवे,अ रशीद अ कदिर व असलम खेतिवाले आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ता उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....