कारंजा लाड -- राज्य सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले असुन या राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या वतीने नागपुर येथे भव्य हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले असुन दि. 11 डिसेंबर रोजी होणाऱ्या या मोर्चात कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी शेतमजूर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व पक्ष निरीक्षक डाॅ. मोहम्मद नदीम यांनी काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत विश्रामगृह कारंजा येथे केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या विराट हल्लाबोल मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी प्रत्येक मतदारसंघात आढावा बैठक घेऊन नियोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारदि. 9 डिसेंबर रोजी कारंजा शहर , तालुका काँग्रेस व एन एस यु आय च्या वतीने कारंजा विश्रामगृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुसद शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष जियाभाई शेख* व सैय्यद भाई जानी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व कट्टर तसेच निष्ठावंत नेते सभेचे प्रमुख अतिथी असलेले दिलीप भोजराज बोलतांना म्हणाले, राज्यसरकारला शेतकऱ्यांविषयी व बेरोजगार युवकांविषयी कोणतीही आस्था राहीली नसून अश्या या सरकारला जाब विचारण्यासाठी म्हणून नागपुर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर हल्लाबोल मोर्चात कारंजेकर कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलचे जिल्हा समन्वयक अँड.संदेश जैन जिंतुरकर, वाशिम जिल्हा काँग्रेस कमेटी पंचायत राज विभागाचे अध्यक्ष ॲड. वैभव ढगे , कारंजा लाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमीर खान पठाण, कारंजा लाड तालुका काँग्रेस चे अध्यक्ष राज चौधरी, वाशिम जिल्हा एन एस यु आय चे उपाध्यक्ष अक्षय बनसोड, कारंजा लाड शहर अल्पसंख्याक काँग्रेस चे अध्यक्ष युसुफ भाई जट्टावाले, कारंजा शहर युवक काँग्रेस चे अध्यक्ष प्रफुल्ल गवई, फैजल खांन पठाण , फारूक भाई, रिजवान खांन व जलील भाई उपस्थित होते असे वृत्त अँड संदेश जिंतुरकर यांनी कळवीले आहे.