येथील महाराष्ट्र राज्य किसान सभा ,लाल बावटा शेतमजूर युनियन व अखिल भारतीय महिला फेडरेशन यांच्या संयुक्त विद्ममाने शेतकऱ्यांच्या व गरीब नागरीकांच्या विविध मागण्यांसाठी दि.२९/०८/०२०२२ सोमवार सकाळी ११:३०वा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून निघून तो तहसील कार्यालयावर धडकणार आहे।यात अतिवुष्टि व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी रु.५०/-हजार नुकसानभरपाई देण्यात यावी. पुरामुळे ज्याच्या शेतातील माती वाहून गेली त्यांना१लाख नुकसानभरपाई देण्यात यावी. पावसाळ्यात ज्याची घरे पडली त्यांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा.या सह विविध मागण्या घेवून मोर्चा तहसील कार्यालयावर धडक देणार आहे।
या मोर्चा मध्ये जास्तीत जास्त संख्येने शेतकरी, शेतमजूर, वयोवृद्ध निराधार, दिव्याग,युवक, विद्मार्थ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन डॉ. महेश कोपूलवार, देवराव चवळे,अँड.जगदिश मेश्नाम, मिनाक्षी सेलोकर, सिंधुताई कापकर,प्रकाशखोब्रागडे, मारोती नरुले,मिलिंद पडले, मनोज दामले, डंबाजी नरुले, सुरेश सोनटक्के, संजय वाकडे, राजु सातपुते, हरीदास मोगरकार,गिताताई शेंडे,इ.केलेले आहे।