अकोला : दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी अकोला डिस्टिक माऊंटेरिंग असोसिएशन व अजिंक्य फिटनेस पार्क तर्फे एक दिवसीय शहानुर ( नरनाळा) सुलाई नाला (वॉटर फॉल) ट्रेक आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचा उद्देश निसर्गाच्या सहवासात आपल्या आरोग्य अधिक बळकट करू या उद्देशाने सर्वजण एकत्रित झाले होते. ट्रेकिंग म्हणजे फक्त डोंगर चढण आणि उतरण का? नाही. ट्रेकिंग म्हणजे मौज मजेत साठी असलेली सहल का? नाही. ट्रेकिंग म्हणजे फक्त चालणे का? नाही. ट्रेकिंग म्हणजे फक्त डोंगरावर जाऊन सेल्फी काढणे का? नाही. ट्रेकिंग म्हणजे आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून स्वतःसाठी काढलेला थोडा वेळ. ट्रेकिंग म्हणजे आपल्याला इतिहास जाणून घेण्याचा एक प्रयत्न ट्रेकिंग म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जाऊन घेतलेला सुखाचा एक श्वास. ट्रेकिंग म्हणजे मेडिटेशन महिन्यातून एकदा तरी ट्रेकिंगला जा, रोग आणि आजारातून बाहेर पडा. ट्रेकिंग करणाऱ्यांना श्वसन, रक्तप्रवाह, गुडघे, छाती , पोट आणि मानसिक आजार होणार नाहीत. असे मत सहभागी झालेल्या सदस्यांची आहे व या ट्रेक दरम्यान सहभागी झालेल्या सदस्यांनी निसर्ग वाचनाचा सुद्धा आनंद घेतला........
विदेश करुले, समर्थ देशमुख, राज्जा सय्यद, विनीत नेमाडे, प्रत्युषा वर्मा, प्रसाद गायकवाड, गौरी गायकवाड, अक्षय शिंदे, अंकुर बायस्कर, मृदुल वानखडे, जय वासरानी, प्रशांत पाटील, अर्चना झापे, वंदना मांगटे, पुष्कर वानखडे, धनश्री ढोरे, सानिध्य ढोरे, अभिलाषा खारकर, क्रांती खारकर, गार्गी भगत, सारिका बोबडे, विनोद बोबडे, गोपाल लड्डा, कौस्तुभ डोंगरे, सुहास पातुर्डे, नीता पातुर्डे, ओम राऊत, वेदांत राऊत, राधा येडलवार, डॉ. निर्मला रांदड, विशाखा सरकटे, वंश डाबरे, श्रेयांश देशमुख, यथार्थ तायडे, ईश्वरी नकाले, शाझा सय्यद, सय्यद मोहताशिम, आयेषा मिर्झा
स्वयम मुळे, प्रियांश वासरानी,
सानिका खापरकर, धनंजय भगत.
या ट्रेक दरम्यान आपत्ती व्यवस्थापना मधील सर्पदंश, संजीवनी क्रिया व पाण्यात होणारे अपघात व त्यावर उपाययोजना कशी करावी याचेही प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाला
अकोट वन्यजीव विभाग अकोट,
विरा दि हट्टी रेस्टॉरंट, डॉ.सुनील बिहाडे ( वैद्यकीय अधिकारी), सौ भारती गोपाल खाडवाय
स्वयंसेवक :- कल्पेश ढोरे, अश्विन दाते, अमोल पवार, श्रीकांत गावंडे, पार्थ बोबडे, महादेव गोरे, धीरज कातखेडे, यांचे सहकार्य लाभले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....