अकोला : गोरक्षण रोडवरील व्हीएचबी कॉलनी स्थित मुख्य रस्त्यावरील भव्य प्रांगणात विराजमान होणाऱ्या गोरक्षण रोडच्या राजाच्या आगमनाची मंडळातर्फे भव्य तयारी सुरू असून शुक्रवारी हिंदु विधी पूर्ण करीत मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. तर यावेळी आगमनपर निर्मित करण्यात आलेल्या गीताचे सुद्धा विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अशातच गेल्या वर्षीपासून गोरक्षण रोड स्थित व्हीएचबी कॉलनी येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या भव्य प्रांगणात गोरक्षण रोडच्या राजा या मंडळाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. गतवर्षी मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या या मंडळाने मोठ्या संख्येने भक्त गणांची मने जिंकली होती. यावर्षी गणेशोत्सव आणखीन भव्य दिव्य पद्धतीने साजरा करण्याची तयारी केली असून त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून माजी नगरसेवक बाळ टाले, अजय शर्मा, विजय इंगळे, खदान पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे, स्वानंद कोंडोलीकर, अजय सेंगर तर मार्गदर्शक म्हणून संजय शर्मा, सुधीर रांदड, मनोज बिसेन, सुनील कोरडिया, राम राठी, रवी चांडक, हरीश शर्मा, दिवाकर गावंडे, राजा होरे, गोलू खंडेलवाल, भरत शर्मा, पवन तिवारी हे उपस्थित होते. यावेळी मंडळाचे प्रथमेश शर्मा, अनमोल बचेर, अक्षय अग्रवाल, नरेंद्र अग्रवाल, मोहित खंडेलवाल, अमित खंडेलवाल, कृष्णा शर्मा, मधुर बिसेन, अभिलाष गाडे, यश बियाणी, सौम्या शर्मा, समर्थ सोनोने, हिमांशु दोषी, आदित्य गावंडे, युवराज पाटील, अभिषेक चांडक, पावस सेंगर, आर्किटेक्ट शुभम शर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी भजनगायक गोपाल शर्मा हारे यांच्या मधुर आवाजात गायलेले ' आये गोरक्षण रोडके राजा ' या स्वागतपर गीताचे विमोचन सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे आभार मंडळाच्या वतीने प्रथमेश शर्मा यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....