जिल्हा परिषद मराठी शाळा धानोरा ताथोड येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री किरण भवानी राठोड सर हे ३० सप्टेंबर २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. श्री राठोड सरांचा धानोरा वासियांच्यातर्फे भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आयोजित निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील ज्येष्ठ नागरिक श्री बबनराव ताथोड हे होते तर सत्कारमूर्ती म्हणून किरण भवानी राठोड सर हे सहपत्नीक उपस्थित होते.
याप्रसंगी गावातील माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री किशोर वानखडे सर हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.गावातील माजी शिक्षिका डहाके मॅडम, इंझोरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री रवणे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते धानोरा येथील सरपंच गजानन कदम, पोलीस पाटील ज्ञानेश्वर कदम हे सुद्धा याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक सुभाष वडेकर हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. किरण राठोड सर यांचा सहपत्नीक सत्कार गजानन कदम व खेडकर मॅडम यांच्यातर्फे करण्यात आला. सुभाष भाऊ वडेकर आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ व संत गजानन महाराजांची प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली,गावातील अंगणवाडी सेविका पद्माताई कापसे व कमलाताई मोहोळ यांच्यातर्फे सुद्धा सत्कार मूर्तींना भेटवस्तू देण्यात आल्या.याप्रसंगी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शाळेत नव्याने बदली करून आलेले शिक्षक विनोद कडू सर हे भावी मुख्याध्यापक म्हणून त्यांचाही गावकऱ्यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. धानोरा ताथोड येथिल माजी आदर्श मुख्याध्यापक रामहरी पंडित यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुभाष वडेकर यांनी केले त्यांनी शाळा शिक्षक व समाज यांचा समन्वय आपल्या प्रास्ताविकातून मांडला.
याप्रसंगी इंझोरी केंद्राचे केंद्रप्रमुख रवणे सर, शाळेतील शिक्षक विनोद कडू सर, शामकांत राऊत सर, यांची समायोचित भाषणे झाली. आपल्या सत्काराला सत्कारमूर्तींनी आपल्या भाषणातून उत्तर दिले. शेवटी अध्यक्षीय भाषण श्री बबनराव ताथोड यांनी केले.
श्री किरण भवानी राठोड हे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा धानोरा ताथोड येथे २०१२ पासून कार्यरत होते आपल्या सेवेचे बारा /तेरा वर्ष ते धानोरा येथे कार्यरत होते.
शैक्षणिक कार्याला त्यांनी सामाजिक कार्याची सुद्धा जोड देऊन आदर्श विद्यार्थी घडवले आदर्श शिक्षक म्हणून धानोरावासियांच्या मनामध्ये किरण भवानी राठोड सर हे आदरास पात्र ठरले.
सदर कार्यक्रमाचे बहारदार आणि अभ्यासू संचालन या शाळेतील माजी मुख्याध्यापक श्री रामहरी पंडित यांनी केले तर आभार प्रदर्शन शामकांत राऊत सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष भाऊ वडेकर व सर्व गावकरी मंडळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी अथक मेहनत घेतली. कार्यक्रमाला गावातील मान्यवर मंडळी शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका सर्व विद्यार्थी मित्र उपस्थित होते.
अशा प्रकारे श्री किरण भवानी राठोड सर यांचा सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम थाटात संपन्न झाला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....