कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) "श्रावण मासी हर्ष मानसी,हिरवळ दाटे चोहीकडे । क्षणात येते सरसर शिरवे,क्षणात फिरुनी ऊन पडे ॥" या बालकवीच्या कवितेचा प्रत्यय देणाऱ्या सुखकर आणि आनंदादायी श्रावण महिन्याचा नुकताच प्रारंभ झालेला असून, चोहीकडे रिमझिम पडणाऱ्या सरींमुळे,शेतकरी राजाचा आनंद ओसंडून वहात आहे.अशातच श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी दि. 21 ऑगष्ट 2023 रोजी आलेल्या शेतकरी राजाच्या नागपंचमी या सणानिमित्त कारंजा नगरीत ठिकठिकाणच्या नाग मंदिरामध्ये सोमवारी नागपंचमी रोजी भाविकांची मांदियाळी असणार आहे. त्याकरीता कारंजा शहरातील वाणीपूरा येथील सर्वात प्राचिन अशा "श्री नागनाथ - मंदिर", रंगारीपूर्यातील "श्री नागोबा-मंदिर", लोकमान्य नगरातील "श्री नागोबा-बोकोबा मंदिर" यवतमाळ रोड,ऋषी तलाव येथील "श्री खोलेश्वर मंदिर",निसर्ग पर्यटन केंद्रांमागील औरंगाबाद मार्गावरील "नागठाणा मंदिर",माळीपुरा येथील "नागोबा मंदिर",कानडीपूरा येथील नागो सोनार यांचे नाग ठाणे,तेलीपूरा येथील निबांजी पाटील यांचे नागठाणे, भारतीपूरा येथील लक्ष्मण गायकवाड यांचे नागठाणे, पुरातन श्री सिध्देश्वर मंदिर, शिवायन नमः मठ आणि निसर्ग पर्यटन केंद्रानजीकच्या वारुळांवर दर्शनार्थी भाविकांची प्रचंड गर्दी राहणार आहे.
कारंजा आगारा समोरील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ( पाणी पुरवठाच्या ) आगार आवारामधील ,सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर यांनी स्थापन केलेल्या श्री फुलनशेष मंदिरावर संपूर्ण कारंजेकर नागभक्त आणि शेतकरी,अधिकारी-कर्मचारी, व्यापारी भाविकांची दर्शनिकरीता प्रचंड गर्दी रहाणार असून, रविवारी सर्वच मंदिरावर बारीचे ठावाचे भजन आणि मंगळवारी दि.22 ऑगष्ट रोजी बायपास राणी झाशी चौकातील महाराष्ट जीवन प्राधिकरणच्या श्री फुलनशेष मंदिरावर सर्व कारंजेकर भाविकांसाठी महाप्रसाद आयोजीत करण्यात येणार असल्याचे वृत्त मिळाले आहे.