दिव्यांगाच्या कल्याणाकरीता स्वतत्र मंत्रालय स्थापन होऊन, दिव्यांगाच्या कल्याणकारी योजनाच्या अंमलबजावणी होण्या करीता, संपूर्ण महाराष्ट्रातिल दिव्यांगाच्या विविध संस्था आणि संघटना गेल्या कित्येक दिवसांपासून स्वतंत्र मंत्रालयाची मागणी करीत होत्या. परंतु या मागणीला बळ मिळाले ते सच्चे समाजसेवक, दिव्यांगांचे हितचिंतक, माजी राज्यमंत्री आणि अचलपूर परतवाडा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार असलेल्या, प्रहार अपंग संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष आ. बच्चुभाऊ कडू यांच्या प्रयत्नाला. गेल्या पंचवीस वर्षांपासून आ . बच्चुभाऊ कडू दिव्यांगाच्या समस्यांना वाचा फोडण्याकरीता कटीबद्ध रहात दिव्यांगांच्या मागण्या सातत्याने शासन दरबारी रेटून लावीत होते . त्यांच्या प्रयत्नाला बरेच वेळा यश मिळून, दिव्यांगाकरीता कित्येक प्रस्ताव वेळोवेळी मंजूर करून शासनाने तसे आदेश सुद्धा काढले असल्याचे सर्वश्रूत आहे. तसेच लवकरच दिव्यांगांच्या मासिक अर्थसहाय्या मध्ये सुद्धा वाढ होणार असून, संजय गांधी दिव्यांग योजनेचे अनुदान दोन हजार रुपये दरमहा होणार असल्याची सुद्धा माहिती मिळालेली असून, शासनाने आ बच्चुभाऊ कडू यांची दिव्यांग कल्याण स्वतंत्र मंत्रालयाच्या मागणी देखील मंजूर करण्याचे ठरवून, दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय निर्मितीची तयारी सुरु केल्याचे विश्वसनिय वृत्त, कारंजा येथील विदर्भ दिव्यांग संस्था कारंजा यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून या दिव्यांगाच्या नेत्यावर - प्रहारचे संस्थापक आ . बच्चुभाऊ कडू यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी सखोल माहितीच्या आधारावर कळवीले आहे.