कारंजा : कारंजा येथील आर्थिक परिस्थितीने अत्यंत गरीबातील गरीब असलेला, तरुण मुलगा भारत नाथेकर हा अत्यंत आनंदी स्वभावाचा नवयुवक आज पोटाच्या कॅन्सर ने दुर्धर आजारग्रस्त झालेला आहे. अत्यंत आनंदित राहणारा पण आज त्याच्याकडे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. घरची सर्व जबाबदारी सांभाळताना त्यांनी त्याच्या तब्येतीकडे खूप दुर्लक्ष केल्यामुळे आज त्याचा कॅन्सर अत्यंत खालच्या पातळीमध्ये आलेला आहे. आज त्याचेवर उपचार करण्याची त्याच्या कुटूंबाची ऐपत नाही . त्यामुळे हा तरुण बिचारा एकाकीपणे आजाराशी झुंज देत आहे. सध्या भारत नाथेकर हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल नागपूर येथे उपचारा करता ऍडमिट आहे . व त्याचे वरील उपचाराकरीता महागड्या शस्त्रक्रियेची गरज आहे, व शस्त्रक्रियेकरिता सर्वोतोपरी आर्थिक सहकार्याची आणि आपल्या दयाळूपणा, सहानुभूती, दानशूरतेची गरज आहे. त्यामुळे या तरुणाच्या इलाजा करीता कारंजा नगरीतील सर्व दानशूर नागरिकांना नम्र विनंती आहे की आपल्या परीने जे काय होईल ते आर्थिक मदत आम्हाला या १)फोन पे नंबर ( आकाश कर्हे ) No .9850012312 किंवा २ ) फोन पे नं. ( धिरज जुमळे ) No .9923963643 या क्रमांकावर जमा करावी. असे आवाहन कारंजातील भारत नाथेकर यांची युवा मित्रमंडळी आकाश कर्हे तथा धिरज जुमळे यांनी केले आहे . तुमच्या थोड्या मदतीमुळे त्याचा जीव नक्कीच वाचेल तरी कृपया आपण त्या दुर्धर आजारग्रस्त तरुणासाठी जास्तित जास्त आर्थिक मदत करून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांच्या मित्रांचे वतीने,महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिमचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे .