समाज मन जिंकणारे, विजयी शिवसेना नेते,खा. संजयभाऊ देशमुख.
पहिल्यांदाच लोकसभा निवडणूकीच्या रणमैदानात,उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेद्वार म्हणून संजयभाऊ देशमुख यांची उमेद्वारी,महाविकास आघाडी कडून ज्यादिवशी घोषीत केली होती.त्याच दिवशी मतदार संघाच्या डोळस मतदार-नागरिकांनी,संजयभाऊ देशमुख हे आजच खासदार झाले." असल्याचे निर्विवादपणे म्हटले होते. त्यामागे त्याचे कारण ही वेगळे होते.जनता जनार्दनाला बदल आणि सर्वांचा सर्वांगीन विकास करणारा खासदार हवा होता.आणि त्यादृष्टिने संजयभाऊ देशमुख यांचेकडे मतदार संघातील जनतेकडून विश्वासाने पाहिले जात होते. एव्हाना सर्व जातिधर्माशी मिळून मिसळून,विश्वासाने जनतेची कामे करणारा नेता म्हणून संजयभाऊ देशमुख यांची मतदार संघाला ओळख होती. . लोकसभा निवडणूकीत विजयाचा गुलाल उधळला गेल्यापासून,खा.संजयभाऊ देशमुख क्षणाचीही उसंत न घेता, सदैव मतदार संघाची जबाबदारी घेऊन अविरतपणे काम करीत आहेत.तसा त्यांचा जनसंपर्क पूर्वी पासूनच दांडगा होता.परंतु खासदार झाल्यापासून तर त्यांनी आपला जनसंपर्क कितीतरी पटीने जास्त वाढविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक लहानमोठ्या वस्ती वाड्यांवर,गरीबातल्या गरीब मतदारांच्या विनंतीला मान देवून,छोट्या मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावून,जनता जनार्दनाच्या अडीअडचणी-त्यांची गाऱ्हाणी सोडविण्याचे महत्तम कार्य करतांना आज रोजी खा. संजयभाऊ देशमुख हे आज दिसत आहेत. बुधवार दि.०४ जून २०२५ रोजी, खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या लोकसभेतील कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत आहे.त्या निमित्ताने त्यांच्या मागील वर्षाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.लोकसभा निवडणूकी नंतरच्या त्यांच्या मागील वर्षाच्या सेवाकार्याचा गोषवारा घेतला असता आपण सहज म्हणू शकतो,त्यांचे एकंदरीत राजकिय आणि सामाजिक कार्य म्हणजे जणू यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी ध्येयपूर्तीचे-विकासाच्या विश्वासाचे आणि सक्षम नेतृत्वाचा नवा इतिहास ठरणारे आहे.त्यांच्या कार्याचे परिक्षण केल्यानंतर आपण सहज म्हणू शकतो की,गेल्या २५ वर्षाचा मागोवा घेतला तर यापूर्वीचे खासदार निवडणूकीचे दिवस सोडले तर मतदार संघात फारसे दिसतच नव्हते.परंतु खा. संजयभाऊ देशमुख मात्र अपवाद ठरले आहेत.खा. संजयभाऊ देशमुख हे सर्वसामान्य जनतेच्या, मग ते शुभ कार्य असो वा एखादा दुःखद प्रसंग.त्यांना माहिती मिळताच प्रत्येक व्यक्तीच्या घरापर्यंत स्वतःहून चालून जातात. सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेऊन,मतदार संघाचा जास्तित जास्त विकास करण्यावर भर देतात.
मागील पंचवीस वर्षांमध्ये या मतदारसंघाने अनेक नेते पाहिले परंतु,गेल्या एका वर्षात खा. संजयभाऊ देशमुख यांनी केलेल्या कामगिरीला कोठेही तोड नाही,जबाबदार खासदार म्हणून त्यांच्या केवळ एकाच वर्षाच्या कार्यशैलीने एक नवा पायंडा पाडला आहे. एकीकडे खा. संजयभाऊ देशमुख हे, यवतमाळ वाशिम मतदार संघातील,शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ आणि विकासापासून आकांक्षित असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी, दिल्लीच्या संसदेत आपला आवाज बुलंद करीत आहेत. तर दुसरीकडे ते प्रत्येक तालुक्यात आणि गावतांड्यावर जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत.
गेल्या वर्षभरात सातत्याने त्यांनी संसदेमध्ये,शेतकऱ्यांचे प्रश्न,रेल्वे सुविधा,आरोग्यसेवा,पायाभूत सुविधा,युवक रोजगार,महिलांचे हक्क, दिव्यांगांच्या अडचणी,आदिवासींच्या समस्या असे असंख्य मुद्दे रेटून धरले आहेत.पिकविमा,खत टंचाई, कापसाला भाव,यांसारख्या अडचणींवर त्यांनी सरकारकडून थेट उत्तरे मागितली.
खा. संजयभाऊ देशमुख यांची कार्यशैली निश्चितच वाखाखण्याजोगी असून,त्यांना आपले मतदार जनता जनार्दनाविषयी विशेष कळवळा असल्याने त्यांनी मतदारांशी ऋणानुबंध टिकवून ठेवले आहेत. त्यामुळे कधीकधी तर ते खासदार नसून सर्वसामान्यांसारखे सर्वांशी मिळून मिसळून वागतांना दिसतात.कामाच्या व्यतिरिक्त दिल्लीत न थांबता,दररोज जनता जनार्दनां मधील, विवाह सोहळे,वाढदिवस,तेरवी, वास्तूशांती, सांत्वनपर भेटी यांना महत्व देऊन सामान्य माणसाच्या सुखदुःखात सहभागी होत असतात.
यवतमाळ-वाशिम जिल्ह्यातील आजारी,गरजू , दिव्यांग रुग्णांसाठी त्यांनी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे.या यंत्रणेच्या माध्यमातून ते थेट गरजूंना वैद्यकीय उपचारासाठी मदत करतात.
गेल्या एका वर्षात त्यांनी निव्वळ संसदेत प्रश्न विचारण्याचेच काम केले नाही,तर ते जनता जनार्दनासाठी लढणारे, धडपडणारे आणि सतत उपलब्ध असलेले खासदार म्हणून सिद्ध झाले आहेत.त्यामुळेच आज रोजी त्यांनी मतदार संघाच्या जनतेच्या हृदयपटलावर आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे.खासदार म्हणून आपली ओळख सिद्ध केली आहे.आज रोजी त्यांच्या नेतृत्वाने संपूर्ण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात विकासाला गती, मतदारांची प्रगती आणि सर्वसामान्य मतदारांच्या न्यायहक्कांनना जणू वाचा मिळाली आहे.
आज खा.संजयभाऊ देशमुख हे केवळ खासदार नसून,आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक व्यक्तींचा बुलंद आवाज आहेत. दि.०४ जून २०२५ रोजी खासदार म्हणून त्यांच्या कार्याला एक वर्ष पूर्ण झाले आहेत.येणाऱ्या पुढील दिवसात - पुढील वर्षात त्यांच्या अथक प्रयत्नामुळे निश्चितच मतदार संघाची भरभराट होईल. त्यांच्या कारकिर्दीत विकासाच्या नवनविन योजना राबविल्या जातील असा मतदारांना विश्वास आहे.या वर्षपूर्ती निमित्ताने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! खूप खूप शुभेच्छा !! संकलन : संजय कडोळे, (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त जनसेवक) अध्यक्ष : विदर्भ लोककलावंत संघटना, कारंजा (लाड) जि.वाशिम.
आपल्या प्रतिक्रिया द्या....