कारंजा :- सध्या लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटणी यांचे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघ परिक्षेत्रातील लोकहिताच्या लोकोपयोगी कामांकडे लक्ष्य लागलेले असून, दि.2 सप्टेंबर 2023 रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ.राजेंद्र पाटणी यांच्या शुभहस्ते कारंजा शहरातील मध्यवस्तीतील बाजारपेठेतील प्रचंड वर्दळ असणाऱ्या दिल्ली वेश बांधकाम व सुशोभिकरणाकरीता, स्थळ : दिल्ली वेश येथे सकाळी 9 : 00 वाजता दिल्ली वेश कारंजा या राज्य संरक्षित स्मारकाचे जतन व दुरुस्ती कामाचे भूमीपुजन संपन्न होत आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा शहराध्यक्ष ललितजी चांडक, तालुका अध्यक्ष डॉ.राजीव काळे, मुख्याधिकारी नगरपरिषद दीपक मोरे,सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग नागपूर अनिल गोटे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. तसेच त्यानंतर लगेचच सकाळी 10 वाजता दारव्हा रोडवरील, दादगाव रेल्वे फाटका नजीक,नगर वन योजनेच्या कामाचे तार कंपाऊंडचे भूमिपूजन आ.राजेंद्र पाटणी यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.या कार्यक्रमात प्रमुख अतिथी वाशिम उपवन संरक्षक अभिजित वायकोस (भा.व.से.), कारंजा भाजपा शहराध्यक्ष ललित चांडक,भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे यांची उपस्थिती असणार असल्याचे वृत्त भाजपा तालुका प्रसिद्धीप्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्विय सहाय्यक संजय भेंडे यांनी करंजमहात्म्य परिवाराला कळविले आहे.