बालिका दिनाचे औचित्य साधून रायझिंग दे सप्ताह निमित्याने सायबर सेल गडचिरोली व पोलीस स्टेशन आरमोरीच्या संयुक्त विद्यमाने हितकारिणी उच्च माध्य विद्यालय आरमोरी येथे सायबर सुरक्षेवर कार्यशाळा दि. 03/01/2025 ला पार पडली.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जयदास फुलझेले, प्रमुख मार्गदर्शक पोलीस निरीक्षक कैलास गवते, महिला पोलीस उपनिरीक्षक नेहा हांडे सायबर सेल गडचिरोली, महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती राक्षे पोलीस स्टेशन आरमोरी तसेच पोलीस अमलदार व माध्य. विदयालयचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक नेहा हांडे यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन फ्रॉड बद्दल माहिती दिली सर्वात जास्त सायबर ठगी मोबाईलच्या माध्यमातून होत आहे. याबद्दल जनमाणसांत जागृतीचा अभाव जाणवत आहे. स्पॅम कॉलला उचलू नये, एपीके फाईल डाऊनलोड करू नये, कॅमेरा अॅक्सेस ऑल टाइम अॅक्टिव्ह ठेवू नये,सोशल मीडिया अकाउंट पब्लिक न ठेवता प्रायव्हेट करावे असे मार्गदर्शन केले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनेच्या आहारी न जाता व कोणतेही चुकीचे पाऊल न उचलता जागरूक नागरिक तसेच जागरूक मोबाईल धारक बनून फसवणूक टाळा अश्या प्रकारे विद्यार्थ्यान पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी आव्हान केले.
कार्यशाळा सपन्न होताच आरमोरी बडी परिसरात रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. रुपाली शेंडे, व आभार प्रा. राखडे यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व प्राध्यापक व पोलीस स्टेशन आरमोरीचे पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.