जाफराबाद:- जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील नालंदा बुध्द विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिन साजरा करण्यात आला
यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी , ग्रामस्थ जि.प शाळेतर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करण्यात आले
याठिकाणी माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, गणेश धनवई, माजी सरपंच फैसल चाऊस, गौतम म्हस्के , सर्जेराव कुमकर संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य किशोर कांबळे, विष्णु जमधडे, गजानन अंधारे, बोरसे पांडूरंग, भिखनखा पठाण, विक्रम उखर्डे, रमेश शेळके, मुख्याध्यापक मुरलीधर वायाळ , रंजित जाधव यांच्यासह आदींची उपस्थिती होती.