कारंजा लाड -- वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे सरचिटणीस सर्वांचे आवडते लाडके प्रांजळ दिलखुलास दिल खुश बेदर्दी सर्वांचे लाडके दीनदुबळ्यांची सेवा करणारे रात्रंदिवस लोकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारे प्रत्येकाला मदतीचा हात देणारे सर्वसामान्यांची हक्काची बाजू मांडणारे निर्भीड व आक्रामक व्यक्तीमत्व आमचे मार्गदर्शक मित्र जीवाभावाचे जिव्हाळ्याचे एका सख्ख्या भावाप्रमाणे मदतीला हात देणारे कारंजातील सर्व मित्र मंडळी चे लाडके अब्दुल राजिक शेख ह्यांचा वाढदिवस दि. 28 रोजी शहरातील विविध संघटनांनी शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन उत्साहात साजरा केला.
सर्वप्रथम महात्मा फुले चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात अॅड संदेश जैन जिंतुरकर, इमरान शेख व तौसिफ खांन सरफराज खांन ह्यांनी अब्दुल राजिक शेख ह्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले.तर आपल्या प्रास्ताविकातुन अॅड संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी राजिक शेख ह्यांच्या आजपर्यंतच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. साधी राहणी , प्रचंड आत्मविश्वास व चिकाटी तसेच सामाजिक काम करण्याची जिद्द असलेला राजिक माझा मित्र असल्याचा मला अभिमान आहे अशी भावना संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी व्यक्त करुन भविष्यातील राजकीय व सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.
ह्यावेळी तौसिफ खांन सरफराज खांन , इमरान शेख , पत्रकार संजय कडोळे , पत्रकार ज्ञानेश्वर घुडे , इंम्तियाज लुलानिया , सैय्यद नसीरुद्दीन , कादर खान , लियाकतभाई मुन्नी वाले , सैय्यद जावेद , यासीर भाई , युसूफ मौलाना , मोहम्मद अकबर भाई , अक्रम रेघीवाले, नदीम खान सागर स्टुडिओ चे कलीम भाई उपस्थित होते.