कारंजा (लाड) : स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना आणि जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाच्या वारकऱ्यांनी दिंडीप्रमुख हभप संजय म.कडोळे यांच्या नेतृत्वात,श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारीपूर्वी,शुक्रवारी दि.17 मे 2024 रोजी श्रीक्षेत्र कारंजा (लाड) ते श्रीक्षेत्र वत्सगुल्म वाशिम नगरीतील श्री.चामुण्डा देवी संस्थान,भगवान श्री.बालाजी संस्थान,श्रीक्षेत्र नागरतास (मालेगाव)येथील श्री जगदंबा देवी संस्थान भवानी देवी,प्रति पंढरपूर श्रीक्षेत्र डव्हा येथील संत श्री.नंगेनाथ महाराज संस्थान,श्रीक्षेत्र काळामाथा [उमरदरी] येथील संत श्री. अवलिया महाराज संस्थान,श्रीक्षेत्र तपोवन येथील श्री सरस्वती देवी संस्थानची वारी करीत देवदर्शनाचा लाभ घेतला. केली.यावेळी प्रामुख्याने वारकरी मंडळीमध्ये सौ.इंदिराताई मात्रे,श्रीमती शोभाताई मापारी, श्रीमती कांताताई लोखंडे, हभप अजाब महाराज ढळे,प्रदिप वानखडे,गोलू लाहे,हभप लोमेश महाराज चौधरी इत्यादी वारकरी सोबत होते.शांत चित्ताने भक्तिमय वातावरणात अतिशय नयनरम्य अवर्णनिय असा वारी सोहळा संपन्न झाला.असे वृत्त प्रसिद्धी प्रमुख उमेश अनासाने यांनी कळवीले.