कारंजा (लाड) गेल्या पंचवीस वर्षापासून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाला आपली कर्मभूमी मानून,स्व राजेंद्र पाटणी यांचे कार्य सातत्याने सुरू होते.कारंजा विधानसभा मतदार संघाच्या मतदारांनीही त्यांच्या वर कायमच विश्वास ठेवून त्यांना भरभरून प्रेम दिले.त्यामुळे पहिल्यांदा विधान परिषद व नंतर शिवसेनेच्या उमेद्वारीवर त्यांना निवडून दिले.त्यानंतर मात्र सन 2009 मध्ये स्थानिकचे दिग्गज नेते स्व.प्रकाशदादा डहाके यांनी त्यांना मात दिली.व राष्ट्रवादी पक्षाच्या उमेद्वारीवर स्व. प्रकाशदादा डहाके विधानसभेत निवडून गेले.परंतु तरीही पराभूत झालेल्या,स्व. राजेंद्र पाटणी यांनी हार न मानता कारंजा विधानसभा मतदार संघाशी आपले ऋणानुबंध कायम ठेवले.या काळात मतदार संघाशी सततचा जनसंपर्क कायम ठेवला.दरम्यान त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला. आणि सन 2014 व 2019 च्या निवडणूकीत सलग दोन वेळा भाजपाच्या उमेद्वारीवर कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातून विजय मिळवीला. 2014 नंतर जिल्हात भाजपा संघटन वाढविण्याकरीता जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांचेवर देण्यात आली.या संधीचे सोने करीत त्यांनी जिल्ह्यात भाजपा पक्षाची,पायामुळे घट्ट रोवण्यात यश मिळवीले.त्यांचा प्रामाणिक व मनमिळाऊ स्वभाव, मृदभाषी हास्यमुख अविर्भाव, गाढे तत्वज्ञान,दांडगा अनुभव, विकासकामे पूर्ण करून घेण्याची हातोटी त्यामुळे त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागून जिल्ह्याला त्यांच्या रुपाने स्वतःचे पालकमंत्री मिळतील.अशी रास्त अपेक्षा स्थानिक मतदारांना लागून राहिलेली होती.परंतु दुदैवाने प्रत्येक वेळी महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात आला व त्यांना पालकमंत्री म्हणून पाहण्याची जिल्हावासिय मतदारांची अपेक्षा अपूर्णच राहीली आणि अखेर शुक्रवार दि 23 फेब्रुवारी 2024 रोजी वयाच्या 59 व्या वर्षी दुर्धर आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ कारंजा मतदार संघातच नव्हे तर वाशिम जिल्ह्याच्या राजकिय क्षेत्रात फार मोठी पोकळी,फार मोठी उणीव निर्माण झालेली आहे.त्यांच्या अकाली निधनामुळे ऐन सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यकाळात भाजपा पक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे.आणि त्याही पेक्षा जास्त नुकसान कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे होणार आहे.कारण वर्तमान परिस्थिती मध्ये कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाला त्यांचे खेरीज दुसरा व्यक्ती पर्यायच नाही असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आमदार स्व. राजेंद्र पाटणी यांच्या मृत्युची बातमी मतदार संघात वाऱ्यासारखी परसरताच खरंतर चोहीकडे त्यांच्या नंतर कोण ? हा प्रश्न देखील आज चर्चीला जात आहे.कारण राजा गेल्यानंतर, त्यांचा वारसा चालविण्याकरीता राजसिहासन कुणाला तरी सांभाळावचं लागतं.त्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांचा उत्तराधिकारी कोण ? त्यांचा वारसदार कोण ? हा प्रश्न सुद्धा मतदार संघात चर्चीला जात आहे. तसेच मतदार संघात वेळोवेळी स्थानिक आमदार असावा असीही चर्चा होत आहे. कर्मधर्मसंयोगाने,आमदार स्व. राजेंद्र पाटणी यांच्या मुलाचा ज्ञायक पाटणी यांचा विवाह,दोन महिन्यापूर्वीच कारंजा येथील चांडक परिवारातील सुकन्येशी झाला असल्यामुळे ज्ञायक पाटणी यांची कारंजाच्या भूमीसी-कारंजाच्या मातीसी नाळ जुळलीच आहे.त्या नात्याने ते कारंजाचे जावाई आहेत.शिवाय गेल्या दोन ते तिन वर्षापासून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात त्यांचे सेवाकार्य सुरू असल्याने कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचा त्यांचा अभ्यास झालेला आहे. शिवाय भाजपाने त्यांना आगामी विधानसभा निवडणूकीत उमेद्वारी दिल्यास,स्व.राजेंद्रजी पाटणी यांच्या पुण्याईने कारंजा मतदार संघातून त्यांना सहानुभूतीच्या लहरीचा लाभ मिळून विजयश्री प्राप्त होऊ शकते.असा महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचा अंदाज आहे.त्यामुळे भाजपा पक्षाने आगामी विधानसभा निवडणूकी करीता आमदारपुत्राचा विचार जरूर करावा.किंवा आमदार स्व.राजेंद्र पाटणी यांचे कारंजा येथील व्याही तथा भाजपाचे नेते ललितजी चांडक यांच्या नावाचा आमदार स्व.राजेंद्र पाटणी यांचे उत्तराधिकारी म्हणून विचार करावयास हरकत नाही.असे विचार,ज्येष्ठ पत्रकार तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी परखडपणे मांडलेले आहेत. कारण शेवटी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व कुणाला तरी करावेच लागणार आहे त्यामुळे भाजपाने पहिले संधी स्व.राजेंद्र पाटणी यांच्या परिवाराशी निकटवर्ती असलेल्यांना दिली तर निश्चितपणे त्यांचे सहानुभूतीने स्वागत होऊ शकते एवढे मात्र निश्चित.