कारंजा:- दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी डोंगरगाव येथे शेतकऱ्यांच्या वतीने गावात पोळा सण मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा करण्यात येतो .याही वर्षी या सना निमित्त गावकऱ्यांनी आपले बैल सजवून दरवर्षी प्रमाणे पोळा सणात सहभाग नोंदविला. शेतकरी मोठ्या आनंदाने ,उत्साहाने हा सण साजरा करतात. यावर्षी येथील रहिवासी असणारे भाजपा तालुका अध्यक्ष डॉक्टर राजीव काळे यांचे निमंत्रण स्वीकारून कारंजा येथील महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी सर्वश्री वऱ्हाडे साहेब, तहसीलदार कुणाल झाल्टे साहेब, पोलीस निरीक्षक इंगळे साहेब यात सामिल झाले. त्यामुळे डोंगरगाव येथील या उत्सवात मान्यवर यांच्या हजेरीने येथील शेतकऱ्यांचा आनंद द्वीगुनित झाला.
तालुक्यातील डोंगरगाव येथे दरवर्षी उत्कृष्ट सजावट असणाऱ्या बैल जोड्यांना स्वर्गीय भाऊराव काळे यांच्या परिवारातील कुटुंब ,सदस्यांकडून बैल सजावटीचे साहित्य वाटप करण्यात येते. कारंजा येथील उपविभागीय अधिकारी मा.श्री.वऱ्हाडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कारंजा तहसीलदार मा.श्री.कुणाल झाल्टे साहेब व येथील पोलीस निरीक्षक मा.श्री.इंगळे साहेब यांच्या यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट सजावट असलेल्या बैल जोड्यांना सजावट साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी काळे कुटुंबातील श्रीमती मिराताई काळे, सर्वश्री डॉक्टर सुबोध काळे, संजय काळे,डॉ.राजीव काळे यांच्या सहकुटुंबातील सदस्य उपस्थित होते. डोंगरगाव येथे भेट देऊन या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी यांचे काळे परिवाराच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.