कारंजा : भारतीय संस्कृतीत आपल्या पूर्वजांनी, वडाच्या झाडाला अनेक धार्मिक संदर्भ देऊन, वृक्षाविषयी,महिलांच्या भावना बळकट केल्या आहेत.म्हणून शेकडो वर्षांपासून पतीच्या दीर्घ आयुष्याकरीता वटपौर्णिमेचे व्रत सुरू आहे.मात्र अलीकडे महिला वर्गानी या व्रताला पर्यावरणीय दृष्टी देऊन, व्रताबरोबरच या दिवशी वडाचे झाड लावण्याचा संकल्प त्या करीत आहेत. कारण या झाडातून मोठ्या प्रमाणात प्राणवायू उत्सर्जित होतो,पक्ष्याचा या झाडावर अधिवास असतो.त्यांच्या पानांमध्ये पाण्याची साठवणूक क्षमता भरपूर असते.म्हणून तापमान आणि प्रदूषणावर वडाची झाडे मात करू शकतात. असे मत
गो ग्रीनचे सदस्य परमेश्वर व्यवहारे यांनी व्यक्त केले.
आज वटपौर्णिमेनिमित्य राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहु उद्देशीय संस्थान शाखा वाशीम यांच्या वतीने कारंजा येथील छ. संभाजी राजे चौकात झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छावा मित्र मंडळाचे अध्यक्ष सतीश गिरमकार होते.तर प्रमुख अतिथी म्हणून संतोषी महिला मंडळाच्या अध्यक्षा आशा व्यवहारे,प्रा.प्रणिताताई चौधरी,राजाभाऊ घोगरे,सचिन जाधव,विनोद बांडे,गुरुदेव सेवा मंडळाचे कमलाताई मालखेडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रारंभी वटवृक्षाचे पूजन करून वृक्षाचे रोपण करण्यात आले.
आशा व्यवहारे यांनी राष्ट्रीय पर्यावरण मित्र संस्थेच्या कार्याची माहिती दिली.तसेच आम्ही वृक्षारोपणाबरोबर विविध रोपांची निर्मिती करणार असल्याचे सांगितले.
यावेळी पिंपळ,आंबा,निंब, शेवगा,बेल,कडूबदाम,या झाडांच्या बिया रोपे तयार करण्यासाठी लावण्यात आले.
या प्रसंगी,नंदाताई बोन्द्रे, भारतीताई घोगरे,,मंगलाताई दहापुते,उषाताई डगवार,
सुमनताई साखरकर,जिजाबाई विसरकर,गावंडेताई आदी महिला उपस्थित होत्या.असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना प्रसिद्धी प्रमुख विजय खंडार यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....