वाशिम : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय,पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे व पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कोटपा २००३ कलम (६ अ ) १८ वर्षाखालील व्यक्तींना तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ विकणे, कलम (६ ब) शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ विकणे या अंतर्गत डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक,लाखाळा, शासकीय तंत्रनिकेतन या परिसरातील कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २८ पानटपरी धारकांवर व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून ५ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ.आदित्य पांढारकर, मानसशास्त्रज्ञ राम सरकटे ,सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे जिल्हा समन्वयक मंगेश गायकवाड, पोलीस विभागाचे पो. हे.काँ.अष्टसिध्द नप्ते, पो.काँ.समाधान श्रृंगारे यांचे या कारवाईसाठी सहकार्य मिळाले.