कारंजा (लाड) कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार स्व.राजेंद्र पाटणी यांचे निधन झाल्यापासून,स्वतःच्या घर संसारावर तुळशीपत्र ठेवून,पायाला भिंगरी बांधल्यागत,जीवाचे रान करून अँड.ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक खेड्यापाड्यातील वस्ती वाड्यावरील मतदारांच्या भेटी गाठी घेऊन, त्यांची सुखंदु:ख ऐकून,प्रचंड असा जनसंपर्क व जनसंवाद ठेवून त्यांचे गावातील रस्त्याची कामे असो की सभागृहाची कामे असो, शेतकर्याची कामे असो की मजूर ,कामगार,लाडक्या बहिणी, निराधार वयोवृद्धाच्या अडीअडचणी असो सोडविण्याचा सपाटा सुरु केला होता.आमदार स्व.राजेंद्रजी पाटणी यांची उणीव भरून काढण्याचा त्यांनी वेळोवेळी कसोसीने प्रयत्न केला.त्यामुळे अँड ज्ञायक पाटणी हेच आम्हाला कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार हवे आहेत.अशा लोकभावना मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांनी बोलून दाखविल्या.या संदर्भात अधिक वृत्त असे की,दि.20 ऑक्टोंबर 2024 रोजी अँड. ज्ञायक राजेंद्र पाटणी यांचे कारंजा शहरात आगमन होताच त्यांच्या सभोवती त्यांच्या विषयी सहानुभूती बाळगून असणाऱ्या शेकडो चाहते मतदारांचा गोतावळा जमा झाला.त्यांच्या बायपास स्थित वाशिम मार्गावरील कार्यालयात कारंजा मानोरा शहरातील आणि श्रीक्षेत्र पोहरादेवी सह इतरही खेड्यापाड्यातील कार्यकर्ते व मतदार गोळा झाले आणि ह्यावेळी त्यांनी अँड ज्ञायक राजेंद्र पाटणी यांचेकडे निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. त्यावेळी अँड ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी कार्यकर्ते आणि मतदारांच्या भावना जाणून घेत त्यांचेशी हितगुज साधतांना, "तुम्ही दोन दिवस आणखी विचार करून मी निवडणूक लढवायची काय ? याचा निर्णय घेऊन तुम्ही मला सांगा. तुमच्या भावनांचा आदर करून मी तुमच्या निर्णयाशी बांधील राहील." असे सुतोवाच केले असून त्यामुळे अँड ज्ञायक पाटणी हे विधानसभा निवडणूकीच्या रणांगणात उमेदवारी दाखल करणार असून दि.22 ऑक्टोंबर 2024 रोजी आपला निर्णय ते जाहीर करणार असल्याचे त्यांनी कळवीले आहे. मिळलेल्या माहितीवरून अँड. ज्ञायक राजेंद्र पाटणी यांच्या करीता मतदारांमधून सहानुभूती व्यक्त करण्यात येत आहे.