मनोहर नाईक कला वाणिज्य ,विज्ञान विद्यालय महान येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय व क्विक हिल फाउंडेशन चे सायबर वॉरियर्स साक्षी दिनेश शिरसाट व प्रणाली विजय दवणे यांनी विद्यार्थ्यांना "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" या कार्यक्रमाच्या अंतर्गत ऑनलाईन सुरक्षिततेचे महत्त्व पटवून दिले.
सोशल मीडियाचा योग्य वापर, वैयक्तिक माहितीचे संरक्षण, फसवे संदेश ओळख, सायबरबुलिंग प्रतिबंध या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने क्विझ, चर्चा आणि प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.
कार्यशाळेत विद्याथ्यांच्या शंकांचे निरसन करून मोबाईलचा योग्य उपयोग करण्यासाठी शपथ दिली. ही कार्यशाळा शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला चे प्राचार्य डॉ. जे. एम. साबू सर समन्वयक डॉ. दीप्ती पेटकर म्याम यांच्या सहयोगाने घेण्यात आली व प्राचार्य श्री आडे सर यांनी अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार डिजिटल सवयी विकसित होतात असे सांगितले.