ब्रम्हपुरी :- तालुक्यात मागील उन्हाळ्यामध्ये अतिवृष्टी व गारपीठ झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने अतिवृष्टी व गारपीठ प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे घोषित केले व तसे सबंधित प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामा करून त्यांची यादी तयार करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. मात्र तालुक्यातील चिचगाव तसेच त्या परिसरातील अनेक शेतकऱ्याचे नावे प्रशासनाकडून जारी केलेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत नावे नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत .ब्रम्हपुरी तालुक्यातील चिचागाव सह अनेक गावांच्या शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील अतिवृष्टी , गारपीठ मदत म्हणून अनेक लोकांची नावे आली नाही . त्याना लवकरात लवकर मदत मिळावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल या मागणीचे निवेदन कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात आज तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदन देताना चिचगाव येथील उपसरपंच गिरीधर ठाकरे,सुरेश राऊत, खिरेसवर ठाकरे,तुकाराम राऊत, कवडू लिंगायत, नरेश ठाकरे यासह परिसरातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.