ब्रम्हपुरी : आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (आयटक) ब्रम्हपुरी तर्फे शासकीय विश्राम गृह येथे तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून आयटक राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे पाटील,खोरीपा नेते जीवन बगाडे,प्रशांत डांगे, पदमाकर रामटेके सर,डेव्हिड शेंडे,संघटनेच्या तालुका अध्यक्ष कॉम.वर्षा घुमे,ज्योत्स्ना ठोंबरे,उद्धघाटनाप्रसंगी जिल्हाध्यक्ष काँ. विनोद झोडगे यांनी छाया बोदेले, करुणा चंहानदे, अलका जिभकाटे, करुणा उरकुडे, अंजुषा डवरे,सीमा शेंडे उपस्थित होते.उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना कॉ.विनोद झोडगे पाटील यांनी सांगितले की सप्टेंबर 2018 पासून केंद्र शासनाने मोबदल्यामध्ये कोणती वाढ केली नसून कोरोनाच्या काळात आशा वर्कर व गटप्रवर्तक कडून महत्त्वाचे काम करून घेतल्या नंतर सुद्धा आता पर्यंत ग्रामपंचायत व नगर पंचायत कडून मार्च 2020 ते ऑक्टोबर 22 पर्यंत थकीत मोबदला दिलेला नाही. परंतु कोरोना नंतर ज्या कामाचा मोबदला मिळत असे त्या कामाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये मोफत मध्ये शक्तीने राबवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मानधन वाढीकरता केंद्र शासनाचे विरोधात मोठा लढा लढणे गरजेचे आहे. रिटायरमेंट नंतर ५ लाख रुपये ग्रॅज्युटी, निवृती वय मर्यादा 65 वर्ष करण्यात यावे. १० हजार रुपये मासिक पेन्शन, एच . बी.एन.सी.7 भेटीचे नोट कम कॅमेरा मध्ये फोटो काढण्याची आशा वर्कर ला शक्ती करू नये. २ हजार रुपये दिवाळी बोनस आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना मिळावा तसेच त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा याकरिता चालू वर्षात मोठे आंदोलन करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी जीवन बगाडे, प्रशांत डांगे , पदमाकर रामटेके यांनी ही मार्गदर्शन करून 8 ऑगस्ट रोजी ब्रम्हपुरी येथे जनुरक्षा विधेयक मागे घ्या यासाठी विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे तेव्हा सर्वांनी सहभागी असे आवाहन केले.
आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्या चळवळीला कमजोर करण्याकरता मानधनाची तफावत ठेवून द्वेष निर्माण करण्याचा घाट महायुती सरकारने केला. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असून राज्य शासनाला भविष्यामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतील असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार व राज्य सरकार नवीन कामगार कायदे लागु करत असून त्यामधून कामगारांना किंवा कामगार चळवळीला मोठे धोके उत्पन्न होणार असून त्याविरुद्ध केंद्र - राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणा विरुद्ध कामगारांनी आयटक चे नेतृत्वात संघटितपणे लढा लढणे गरजेचे आहे असे वर्षा घुमे यांनी सांगितले. यावेळी तालुक्यातील शेकडो आशा व गट प्रवर्तक कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.