वाशिम: राज्यातील शेतकरी राजा हा,साधारणत: मृग नक्षत्रामध्ये पावसाला प्रारंभ होऊन,आपल्या शेतजमिनीमध्ये पेरण्या करण्याला महत्व देत असतो.त्यामुळे मृग नक्षत्र लागण्याच्या दिवशी रविवारी दि. ०८ जून रोजी शेतकऱ्यांनी पाऊस होईल.निदान बारिक सारिक पाऊस तरी होऊन मृगाचे मुहूर्त साधेल.अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा केली होती.या नक्षत्राचे वाहन कोल्हा आहे.परंतु दि. ०८ जून रोजी आणि त्यानंतरही दि. ०९, १० जून रोजी पाऊस न झाल्याने,मृग नक्षत्रावर कोल्ह्याने हुलकावणी दिल्याची सर्वत्र चर्चा असून,आता मात्र पावसासाठी शेतकऱ्यांचा जीव चातक पक्षा प्रमाणे कासाविस झाला असल्याचे,शेतकरी मित्र संजय कडोळे यांनी म्हटले आहे.मे महिन्याच्या भर उन्हाळ्याच्या दिवसात मुंबई,कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र,मराठवाड्यासह, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागात अवकाळी पावसाने सलग १५ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची बरसात लावली होती. त्यामध्येही अस्मानी संकटाने शेतकरी राजाच्या उन्हाळी मुग उडिद भुईमुग पिकाचे,फळबागा, फुलबागा,फुलबागाचे नुकसान झाले होते.त्या १५ दिवसात आभ्राच्छादित वातावरण होऊन तापमानात कमालीची घट झाली होती. एकीकडे असा वादळी अवकाळी पाऊस बरसत असतांनाच,दुसरीकडे मुंबई कोकणपट्टी मध्ये,तब्बल दहा बार दिवस अगोदरच अनपेक्षित पणे मान्सूनचे आगमन होऊन,या मान्सूनच्या धडाकेबाज येण्याने, राज्यातील शेतकऱ्यांसह भारतिय हवामान विभाग आणि हवामान अभ्यासकांनाही अचंभ्यात पाडले होते. मुंबई कोकण किनारपट्टी पर्यंत पोहोचलेला हा मान्सून एक दोन दिवसात संपूर्ण राज्यात, मराठवाडा विदर्भातही दाखल होईल.अशी अपेक्षा असतांनाच मात्र अचानक बंगालच्या उपसागरा पासून अरबी समुद्रावर वाहणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यामध्ये रुकावट येऊन, मान्सून खोळंबल्या गेला.त्यामुळे विदर्भातील उष्णतामानातही कमालीचा बदल होऊन,आज रोजी भर पावसाळ्याच्या जून महिन्यात कडक उन्हाळा सुरू होऊन,जनमाणसांना भयंकर उकाड्याला तोंड देण्याची वेळ आली.सद्यस्थितीत गोंदिया, ब्रम्हपूरी,चंद्रपूर, नागपूर, अकोला आदी जिल्ह्यात तापमानाचा पारा ४१ ते ४४ अंशावर स्थिरावला आहे.या उष्णतेपुढे एसी-कुलरही गारवा देण्यात,कमी पडत आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या अनपेक्षित वातावरणाने,आपल्या शेतजमिनीमध्ये पेरणीसाठी तय्यार असलेल्या शेतकरी राजाची चिंता वाढतच आहे. मात्र असे असले तरीही,वाशिम जिल्हातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांच्या म्हणण्याप्रमाणे,दि १३ ते १७ जून दरम्यान मुंबई, कोकण किनारपट्टी, पाश्चिम महाराष्ट्र,पुणे, उत्तरमहाराष्ट्र,खांदेश, मराठवाडा, पूर्व विदर्भाच्या काही भागात पूरस्थिती निर्माण करणारा मुसळधार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता आहे.तर साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराच्या अंदाजानुसार दि १३ ते १७ जूनच्या दरम्यान मान्सूनच्या पावसाची दमदार सुरुवात होईल. मात्र यंदा पेरण्या लांबणार असल्याची शक्यता असून, जूनच्या शेवटी शेवटी आणि जुलै महिन्यातच सर्वदूर पर्यंत पेरण्या होणार आहेत. राज्याच्या हवामान खात्यानेही भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये.असे स्पष्टच सांगितले आहे.आता दि.१३ जून ते १७ जून आणि दि.२५ जून रोजी मुंबई किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा, पूर्व विदर्भ भंडारा,गोंदिया ,गडचिरोली, चंद्रपूर,नागपूर,यवतमाळ, वाशिम भागात मुसळधार ते अतिमुसळधार काहीसा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नदी नाल्याच्या काठावर राहणाऱ्या लोकांनी सतर्क व्हावे.राज्याच्या काही भागात विजाच्या कडकडाटात पाऊस होऊन विजा पडण्याचा संभव असल्यामुळे,आपण सतर्क व्हावे. वाशिम जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्याच्या शेतजमिनीची नांगरणी वखरणी मशागत पूर्ण झाली असून आता त्यांना पावसाची प्रतिक्षा आहे.मात्र तूर्तास पेरणीयोग्य पाऊस होणार नाही तर पेरणी योग्य पाऊस हा जूनच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याचा अंदाज आहे.आणि शेतकऱ्यांनी,चांगला पाऊस होऊन पावसाचे पाणी जमिनीत खोलवर मुरल्याशिवाय आणि मुख्य म्हणजे कृषी विभागाच्या सल्ल्या शिवाय पेरण्या करूच नये.तसेच आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी पावसाळी वातावरण तयार होताच दुपार नंतर शेतातून घरी परतावे.विजांचा लखलखाट होत असल्यास लगेच आपल्या जवळचे मोबाईल डाटा बंद करून स्विच ऑफ करावे., शेतात थांबू नये.हिरव्या झाडाचा आश्रय घेऊ नये.आपल्या शेळ्यामेंढ्यांची आणि गुराढोरांची विशेष काळजी घ्यावी.अतिवृष्टी होऊन पाऊस वाढल्यास पांदण रस्ते, नदी नाले व पुलावरून स्वत : जावू नये.व आपली दुचाकी,चारचाकी वाहने, बैलबंड्या व गुरेढोरे नेऊ नये. जीवन हे अनमोल आहे.त्यामुळे स्वतःची,कुटूंबियांची व गुराढोरांची सुरक्षा करावी. वादळी पावसामुळे शेतात किंवा गावात विजेच्या तारा तुटण्याच्या, विद्युत पुरवठा बंद होण्याच्या घटना सतत घडत असतात. अशावेळी सतर्क राहून रात्रीच्या अंधारात प्रकाशासाठी आपल्या घरामध्ये पर्याची व्यवस्था करावी. घराबाहेर पडतांना छत्री,रेनकोट, विजेरी म्हणजे टॉर्च सोबत ठेवावी.अचानक उद्भवणाऱ्या आपात्कालिन परिस्थिती करीता तलाठी, पटवारी, ग्रामसेवक, तहसिलदार, कृषी सहाय्यक, आरोग्य अधिकारी, फॅमिली डॉक्टर यांचे संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक प्रत्येक शेतकरी शेतमजूरांनी आपल्याकडे असू द्यावे.असे आवाहन शेतकरी मित्र तथा करंजमहात्म्य परिवाराचे प्रमुख संजय कडोळे यांनी ग्रामस्थ शेतकऱ्याकरीता केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....