वाशिम:-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मूकनायक विचार मंच वाशिमच्या वतीने, नववर्षाच्या पुर्व संधेला व्यसन विरोधी गीत गायन व पथनाट्य करून जनजागृती करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अंनिसचे जिल्हा अध्यक्ष डाॅ रामकृष्ण व मूकनायक विचार मंचाचे उपाध्यक्ष सुखदेव काजळे शाहिर निरंजन भगत यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.व व्यसन विरोधी गीत गायन करत रॅली पाटणी चौक मार्गे महामानव विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अर्पण करून जमलेल्या व्यसनाची होळी कुसुमाताई सोनुने व गायिका विद्याताई भगत यांच्या हस्ते करण्यात आली.
समाजातील सर्वक्षेत्रातील अनेक व्यक्ती दारूचे व्यसन करतात, जाहीर ठिकानी करतात, व्यसनाची जाहिरात करतात, त्यामुळे दारूचे व्यसन चुकीचे नसून ते प्रतिष्ठेचे असल्याचे सर्वसामान्यांचा समज झाला आहे. त्यामुळे दारूच्या व्यसनाने मानसिक आजारी झालेल्या व्यक्तीला बदनाम न करता दारूची बदनामी करून दारूची प्रतिष्ठा कमी करण्याची गरज आहे. त्याबाबत प्रबोधन झाले पाहिजे. त्यामुळे नवीन पिढी व्यसनाकडे वळणार नाही. सरकारने व्यसनाच्या पदार्थीची निर्मिती, वितरण यावर नियंत्रण ठेवावे. व्यसनविरोधी कायदे अंमलात आणावेत. व्यसनी पदार्थ विक्रीतून सरकारला जो महसूल मिळतो, त्यावरील परावलंबित्व कमी करावे, आदी प्रतिबंधात्मक कामे सरकारने करावीत. नागरिक आणि महिलांनी व्यसनाला प्रतिकार करण्यासाठी उभे राहिले पाहिजे. गावातील 50 टक्के महिलांच्या सह्यानी ते कायदेशीर दुकान बंद करता येते. नवीन दुकान चालू करताना देखील महिलांची परवानगी सरकारने घेतल्याशिवाय परवाने देऊ नयेत. हा लोकशाही मार्ग झाला. मात्र ज्यांना दारू प्यायची आहे , त्यांनी ती कुठूनही उपलब्ध करून प्यावी, हे त्यांचे स्वातंत्र्य आहे. दारू पिणे हे शून्य टक्के समर्थनीय असले तरी व्यक्तीस्वातंत्र्य जपले पाहिजे. व्यसनमुक्तीच्या कामाची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चतुसूत्री सांगते. व्यसनविरोधी प्रबोधन, प्रतिकार, प्रतिबंध आणि उपचार या चतु:सूत्रीनुसार काम केल्यास व्यसनाधीनता कमी होईल. व्यसन मुक्ती रॅली मध्ये नो विस्की नो बियर, हॅपी न्यु इयर, हॅपी न्यु इयर चा जयघोषात व गित गायनाने संपन्न झाली रॅली मध्ये अंनिसचे जिल्हा अध्यक्ष डाॅ रामकृष्ण कालापाड, जिल्हा कार्याध्यक्ष पी.एस.खंदारे,मूकनायक विचार मंचाचे उपाध्यक्ष सुखदेव काजळे, महिला विभाग प्रमुख कुसुमाताई सोनुने, शाहिर दतराव वानखेडे, शाहिर निरंजन भगत, विद्याताई भगत, अलोकरत्न भगत, शांताबाई पाईकराव, रमेश इंगोले, रवी तेलगोटे, उध्दव वानखेडे, विश्वनाथ इंगोले, सदाशिव राऊत, प्रताप वानखेडे, सुरेश वानखेडे, युवा शाहिर संतोष खडसे, संतोष कांबळे, गौतम कांबळे, प्रकाश खडसे, असित खडसे, मदन भगत, उत्तम भगत, साहेबराव पडघान, गणेश राठोड, भगवान राऊत, सिनेकलावंत अरविंद उचित, ढोलक पट्टू सुनील सावळे, नारायण मिटकरी, समाधान सावंत, लोडजी भगत, मोहन शिरसाठ, भगवान कांबळे शाहिर शेषराव मेश्राम, आनंद इंगोले, भिवाजी भगत, नामदेव खडसे, भास्कर गायकवाड, काजल खिल्लारे, भारती कांबळे इत्यादी कलाकार कर्मयोगी संत गाडगेबाबा, वैदु, वासुदेव, गोंधळी, शाहिरी इत्यादी लोककलेद्वारे व्यसनमुक्तीची जनजागृती करीत सहभागी झाले होते. सदरहु व्यसनमुक्ती रॅली करीता जिल्हाध्यक्ष डॉ रामकृष्ण कालापाड तथा जिल्हा कार्याध्यक्ष पी. एस.खंदारे यांनी अथक परिश्रम घेतले.असे वृत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कारार्थी असलेले महाराष्ट्र राज्यस्तरिय करंजमहात्म्य पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....