कारंजा:- दिनांक 23 सप्टेंबर रोजी ॲड. ज्ञायक पाटणी यांनी रमाई परिसरातील कारंजा नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणात बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेतली. कारंजा नगर परिषद रमाई परिसरातील नागरिक, महिला यांनी साखळी उपोषण सुरू केले होते.विलास हरीदास डोंगरे,शहर उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी कारंजा शहर, रा. कारंजा, ता. कारंजा, जि.वाशिम व इतर रमाई परिसरातील रहिवासी नागरिक, महीला यांनी साखळी उपोषण सुरु असल्याची माहिती भाजपा पदाधिकारी राहुल रविराव यांनी देताच ॲड. पाटणी यांनी या उपोषण मंडपास भाजपा जिल्हा अध्यक्ष शामभाऊ बढे यांच्यासह भेट दिली.रमाई परिसर कारंजा येथे झोपडपट्टी मधील रोड व नालीची काम करणे साठी उपोषणास बसलेल्या समस्या ग्रस्तांसी ॲड.ज्ञायक पाटणी यांनी सविस्तर चर्चा केली. मुख्याधिकारी यांच्याशी दूरध्वनी द्वारे चर्चा करून यातून मार्ग काढला. मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी सांगितले की या कामाचे प्रस्ताव मंजूरातीसाठी पाठविण्यात आले असून प्रशासकीय मान्यता व निधीची उपलब्धता होताच हे कामे मार्गी लावू.
यावर ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी मुख्याधिकारी व येथे उपस्थित उप मुख्याधिकारी निशिकांत परळीकर यांना सांगितले की कामास त्वरित प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा व येथे आठ दिवसात प्रशासकीय मान्यता होईल याची काळजी घ्या असे सांगितले. आणि उपोषणकर्त्यांना आश्वासित केले की लवकरच या कामाची प्रशासकीय मान्यता प्राप्त करून काम होण्याचे दृष्टीने आपण काम करू असे सांगितले. यावर उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त करत आपले साखळी उपोषणाची सांगता केली.
सविस्तर असे की रमाई परिसर कारंजा येथे झोपडपट्टी मधील रोड व नालीची काम करणेबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन देवून रमाई परिसरातील नागरिकांनी सांगितले की, आमच्या परिसरामध्ये रोड व नाली नाही. आम्ही आपल्या वारंवार लेखी व तोंडी तक्रार करुन सुध्दा आपण कोणत्याच प्रकारची कार्यवाही केली नाही. त्यानंतर गजानन काजळे ते दिलीप चव्हाण यांचे घरापर्यंत रस्ता शासनाने मंजुर केला आहे. सदर रस्त्याचे काम शासनाने मंजुर करुन सुध्दा अद्याप पर्यंत आपल्या कार्यालयाकडुन कोणत्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.तसेच ब्रम्हकुमारी आश्रम व नागवाणी शाळे च्या परिसरामध्ये नविन रस्त्याचे व नालीचे काम तातडीने सुरु केले आहे. परंतु आमचे रस्त्याचे काम शासनाने मंजुर केले असुन सुध्दा अद्याप पर्यंत कोणत्याच प्रकारची कार्यवाही आपल्या कार्यालयामार्फत करण्यात आली नाही.
तसेच सध्यास्थितीत पावसाळ्यामुळे नालीची संपुर्ण घाण रस्त्यावरुन वाहत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच परिसरामध्ये अनेक नागरिकांना तायफाईड, मलेरिया, डेंगु, असे अनेक आजारांना समोरे जावे लागत आहे. त्यामुळे जिवीत हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लहान शाळकरी विद्यार्थी, वृध्द पुरुष-महिला, गरोधर महिला यांना सुध्दा सांडपाण्याचा व रस्ता नसल्याने भयंकर त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच परिसरात बऱ्याच लोकांच्या घरी साप, इंचु, इत्यादी सतत येत असल्याने, जिवीत हानी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच जर कोणतीही अघटीत घटना घडल्यास त्यास नगर परिषद जबाबदार राहील, आमच्या अर्जाचा विचार करुन आम्हास तात्काळ नाली व रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा. आम्ही परिसरातील नागरिक आपल्या कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसणार असल्याचा इशारा देवुन साखळी उपोषण सुरु केले होते.विलास हरीदास डोंगर,गजानन चव्हान,सुशिला पवन काळे कुसूम इंगोले, सिमा जगदीश रोबेराडे ,पुष्णा मुधुकर आडोळे ,शोभा इंगोले,कमला चरण मोहोळ , मालीनी राहूल सिरसाठ, स्वाती देवानंद भगत,काजल अजय आडोळे ,सादना काजळे,आशा महीन्दा राऊत,रमा राहूल भगत,अनंता गोडबोले, उज्वला अनता गोडबोले , संगिता विजय राऊत, रुख्साना शेख, सुनिता मेश्राम,संजय इंगोले इत्यादीच्या सह्यासह निवेदन देण्यात आले. ॲड. पाटणी यांच्या सोबत राहुल रवीराव, रामकिसन चव्हाण, गुल्हाने संतोष,मंगेश धाने, दिनेश वाडेकर, सविज जगताप आदी होते.असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....