अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने गडचिरोली पोलिस दलात कार्यरत पोलिस शिपाई जागीच ठार झाल्याची घटना अड्याळ ते जामगिरी मार्गावर सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली.
प्रणय ताराचंद वाळके वय 27 वर्ष रा. मुधोली तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे अपघातात मृत पोलिस शिपायाचे नाव आहे. सदर पोलिस शिपाई आपल्या स्वगावावरून गडचिरोली कडे दुचाकीचे जात असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती कळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले.