वैदर्भिय रंगभूमीचे उत्कृष्ट कलावंत नटवर्य सुधाकर श्रीधरराव गीते यांची महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळावर, महाराष्ट्र शासनाकडून नुकतीच एका शासन आदेशाद्वारे अशासकिय सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण बोर्ड म्हणजेच रंगभूमीचे सेन्सार बोर्ड. त्यांची नियुक्ती बुलडाणा जिल्ह्या मधून करण्यात आलेली असून त्यांच्या नियुक्तीचे वाशिम जिल्हा गोंधळी समाज संघटना आणि विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी अभिनंदन केले आहे.