टेमुर्डा लगत चिंचाळा येथे पिंजदुरा येथील काही नामवंत व्यक्तींनी महसूल च्या जागेवर पांढऱ्या दगडाची लीज घेतली, त्या जागेवरील पांढरा गोटा निघाल्यानंतर ते खड्डे बुजवण्याचे महसूल विभागाने आदेश दिले आहे मात्र ते त्या ठिकाणी माती न टाकता वरोरा तालुक्यातील वरोरा औद्योगिक कंपनीतील दगडी कोळशापासून तयार झालेली राख या लिज धारकाने त्या खड्ड्यात आणून टाकली, त्यामुळे काही दिवसा अगोदर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी त्या खदानित गेले ,त्या खदानी टाकण्यात आलेली पांढरी राख या पावसामुळे खदानी लगत सर्व्हे नं 52 आराजी दिड एकर धाणारी असलेल्या शेतकऱ्याच्या धान शेती मध्ये गेली त्यामुळे यावर्षीचे पिक तर नष्ट झाले परंतु येणारे काही काळात या राखेमुळे तिथे कुठल्याच प्रकारचे दुसरे उत्पन्न होणार नाही तरी याबाबत संबंधित तलाठी यांनी मोका पंचनामा करून पुढील कारवाई साठी तहसीलदार यांच्या कडे देण्यात आला आहे .