कारंजा : (जिल्हा प्रतिनिधि संजय कडोळे)-
माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेन्द्र शिंदे, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांचे मार्गदर्शनात व बाबासाहेब धाबेकर विद्यालय, यावर्डीचे मुख्याध्यापक विजय भड यांचे उपस्थितित दिनांक 21 जून रोजी सकाळी 7:30 वाजता बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
योग दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक विजय भड व क्रीडा शिक्षक राजेश शेंडेकर यांनी विद्यार्थी जीवनात योगाचे महत्त्व विशद केले.
त्यानंतर शाळेचे क्रीडा शिक्षक राजेश शेंडेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवली व विद्यार्थ्यांनी योगाची विविध आसणे करून पाहिलीत. ज्यामध्ये ताडासन,वृक्षासन,त्रिकोणासन, दंडासन, वक्रासन, वज्रासन, भद्रासन, शवासन,मकरासन या आसना सोबतच कपालभारती, अनुलोम-विलोम प्राणायाम इत्यादींचा समावेश होता.
योग दिनाच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमात विद्यालयातील 29 विद्यार्थी व 03 गांवकरी, मुख्याध्यापक विजय भड, शिक्षक अनिल हजारे व राजू लबडे सहभागी होते.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेकडे मिळाल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....