तालुक्यात मागील तीन-चार दिवसांपासून अधून मधून अकाली पावसाने हजेरी लावली असून काल रात्री वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असल्याने उन्हाळी धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या परिसरातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी नैसर्गिक दृष्टचक्राच्या कचाट्यात सापडल्याने चिंतातुर झाला आहे अश्यास्थितीत आशाळभूत नजरेने आकाशाकडे बघत भविष्याचे काय?आणि कसे?होणार या गर्तेत शेतकरी सापडला आहे.ब्रम्हपुरी तालुक्यात शेकळो हेक्टर शेती ही धनपिकाची आहे.येथे बऱ्याच प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड केली जाते.वैनगंगा नदीच्या वरदानाने नदी परिसरातील जमिनीत मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने हा धानपिकाचा पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे.नदिलगतचे नांहोरी,नांदगाव ,तोरगाव,कोलारी,अर्हेरनवरगाव,भालेश्वर,पिंपळगाव,लाळज,सोंद्री,सोनेगाव,सावलगाव,बेटाळा,रनमोचन,निलज,इत्यादी गावांसह इतर गावातही फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात मोटारपंप च्या पाण्यावर भाजीपल्यासह उन्हाळी धनपिकाची लागवड केली जाते. आता त्या धान पिकाच्या कापनीच्या हंगामाला आता सुरुवात झाली असून ऐन कंपनीच्या वेळी बदलत्या वतावरणमुळे अवकाळी पावसासह धनपिकावर तुळतुळ्याचा प्रभाव वाढत आहे.ऐन कंपनीच्या वेळेस तुळतुळ्याने धानपिकवर हल्ला चढविला आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेल्या धानपीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यामुळे आधीच अस्मानी संकटातून बाहेर पडलेल्या शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण होण्याची वेळ आली आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वन्य प्राणी पिके उध्वस्त करीत असून मानव-वन्यजीव संघर्ष पेटला असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे
शिवाय धान पिकावर तुळतुळ्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष,तुळतुळा व अकाली पावसाच्या भीतीने शेतीशिवारातील कापणीस आलेले तर काही कापणीस येण्यापूर्वीच धानाची कापणी जोमात सुरू आहे.वातावरणातील बदल व तुळतुळ्याचे आक्रमण शिवाय वन्य प्राण्यांच्या भीतीने मजूर मिळेनासे झाले आहे.यामुळे शेतकरी कापणी सोबतच मळणी करणाऱ्या हरवेस्टर ला पसंती देत कापणी व मळणी करत आहेत तर अवकाळी पावसाने काही शेतशिवारात जमीन ओली असल्याने हरवेस्टर चिखलात फसत असल्याने मजुरांच्या साहाय्याने धानाची कापणी करत आहेत मात्र वाढत्या मजुरीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
काही दिवसात हंगामी पावसाळ्याची सुरुवात होणार असून निसर्गाने आपला रंग बदलायला सुरुवात केली असून अवकाळी पावसाने काही शेतकऱ्यांचे उभे धानपिक भुईसपाट झाले त्यात पाणी साचल्याने धानाची पोत घसरली त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे.त्यामुळे पिकासाठी घेतलेले कर्ज,कृषी केंद्रांची उधारी कसे फेडायचे व भविष्यातील हंगामाचे नियोजन कसे करावे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कोट:-
आज प्रत्येक वस्तूंचे भाव वाढले आहेत मात्र आम्ही पिकविलेला माल कवळीमोल भावाने विकावे लागत आहे.नांगरटी, खुरपणी,निंदण,खत मजुरी आदींचे भाव दिवसेंदिवस वाढतच असून मजूर मिळणे कठीण झाले आहे.कितत्येक शेतकरी शेती विकून कर्जाची परतफेड करत आहे पण ज्यांच्याकडे विकण्यासारखे काहीच नाही त्यांचं काय?त्यांना परिवाराचे संगोपन करणे सुद्धा कठीण झाले आहे.एवढेच नव्हे तर शेतात वन्यप्रान्याचा सहवास वाढला असून शेतात काम करायला जाणे म्हणजे मुठीत जीव धारण्यासारखे आहे.पण पोट भरण्यासाठी शेतीशिवाय दुसरा पर्याय नसल्याने नाहीलाजने आम्हाला शेतात काम करायला जावे लागत असल्याच्या भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या