ब्रम्हपुरी:- स्वतंत्र विदर्भ चा लढा एकशे पंचवीस वर्षापासूनच सुरू आहे. सत्ताधारी राजकारण्यांनी सतत विदर्भातील जनतेवर अन्याय केला आहे. काँग्रेस- भाजप यांनी खोटे आश्वासन देऊन अनेक निवडणुकीत विजय संपादन केले. पण सत्तेवर जाताच त्यांच्या आश्वासनांचा विसर पडतो. यांना सत्तेच्या बाहेर काढण्यासाठी जिल्हा व तालुक्यातील स्थरावर संघटनात्मक बांधणी सुरू आहे. ब्रम्हपुरी शहरातील रक्तदाता ओळख असलेल्या व सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून ओळखले जाणारे आणि स्वतंत्र विदर्भाच्या लढ्यात अनेक वर्षांपासून सक्रिय सहभाग घेणारे योगेशभाऊ नंदनवार यांची युवा विदर्भ आघाडी ब्रम्हपुरी तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना तालुक्यातील गावपातळीवर जाऊन स्वतंत्र विदर्भ राज्य मिळेपर्यंत प्रामाणिक पणे लढा द्यायचे आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती व युवा विदर्भ राज्य समिती चे सदस्य नोंदणी करणे अपेक्षित आहे. व जास्तीत जास्त जनतेला संघटनात्मक बांधणी करून तालुक्यात विदर्भ राज्य समिती ची रचना संघटनात्मक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे. असे नियुक्ती पत्र युवा आघाडी विदर्भ प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर तथा युवा विदर्भ आघाडी चंद्रपूर विभाग सुदाम राठोड यांनी दिले आहे. योगेश भाऊ नंदनवार त्यांच्या नियुक्ती मुळे तालुक्यातील आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे. व विविध प्रकारच्या संघटना व मित्रपरिवार कडून अभिनंदन करण्यात येत आहे.