कारंजा- दिनांक 24 सप्टेंबर रोजी भाजपा युवानेते ॲड. ज्ञायक राजेंद्र पाटणी आयोजीत अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस माई मुर्तीजापुर संघ, महिला गटातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस जानेफळ कबड्डी संघास देण्यात आले.
अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या अंतीम सामन्यात पुरुष विभागात माई मुर्तीजापुर संघ विजयी झाला असून प्रथम प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये 1,11, 111पटकाविले, पुरुष विभागात द्वितीय क्रमांक बक्षीस जाणेफळ कबड्डी संघ यांनी 71, 111तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस नवरंग वाशीम आणि TMC ठाणे यांना अनुक्रमे 25,500 व 25, 500विभागुन देण्यात आले . महीला विभागात प्रथम क्रमांकाचे बक्षीस जानेफळ कबड्डी संघ यांनी पटकाविले असून यांना रूपये 71,111 देण्यात आले. द्वितीय बक्षीस 51111रूपये TMC ठाणे यांना मिळाले . तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस RCC भोपाल व MH पुणे यांना अनुक्रमे 15,500 व 15500 विभागून देण्यात आले.
कारंजा येथे संपन्न झालेल्या कबड्डी सामन्यात महिला गटाचे 16 संघ सामील झाले तर पुरूष गटाचे 22 संघ सामील झाले होते.
यावेळी ॲड. ज्ञायक पाटणी यांच्या हस्ते व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विजयी संघाना बक्षीस व शिड, प्रमाण पत्र देन्यात आले. व्यास पिठावर कारंजा मनोरा येथील उपस्थित भाजपा मान्यवर, पदाधिकारी, जिल्हा परीषद, पं स सदस्य, गावातील मान्यवर, प्रतिष्ठीत, कबड्डी असोसएशनचे पदाधिकारी, चांडक पाटणी परिवारातील ज्येष्ठ सदस्य, नामांकित खेळाडू, सरपंच, तसेच वाशीम येथील भाजपा पदाधिकारी, महीला पदाधिकारी सह इतरांचा समावेश होता.

दिनांक 20 ला वाशीम जिल्हा कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या आणि दिनांक 21ते 24 सप्टेंबर ला अखील भारतीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्यात. स्पर्धेसाठी विविध राज्यातून संघ आलेत. या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन ॲड ज्ञायक पाटणी यांनी केले होते. अमॅच्युर कबड्डी असोसिएशन वाशीम यांच्या सहकार्यातून ऍड. ज्ञायक पाटणी यांनी यशस्वी आयोजन केले. या कबड्डी स्पर्धांसाठी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते ,क्रिडा प्रेमी यांनी अथक परिश्रम घेतले. भाजपा युवा मोर्चा कारंजा शहर, भाजपा कारंजा शहर पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेत कबड्डी सामने यशस्वी केलेत. भाजपा महीला पदाधिकारी यांचाही सहभाग लाभला. तालुका क्रीडा अधिकारी बोंडे आणि त्यांचे सहकारी यांचे मित्र मोठे मार्गदर्शन व योगदान लाभले.अमॅच्युर कबड्डी असोसिएशन वाशीम असोसिएशनचे पदाधिकारी यांनी सक्रिय योगदान या ठिकाणी लाभले. अनेक नामवंत पंच यांनी या ठिकाणी आपली सेवा दीली. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी सेवा दिली . कबड्डी सामन्याच्या कालावधीत अनेक मान्यवर, क्रिडा प्रेमी यांनी सामन्यास भेटी दिल्यात. सर्वांचे व्यासपीठावर स्थान देत स्वागत करण्यात आले. भाजपा व ईतर पक्षातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी यांनी सामन्यास भेटी दिल्यात.
सामन्यास नागरिकांची प्रचंड गर्दी होती. प्रेक्षक गॅलरी खचाखच भरल्या होत्या आणि मैदानातील उर्वरीत भागात प्रेक्षकांची गर्दी होती. अतिशय आनंदात आणि जल्लोषात सामने पार पडलेत. ॲड. ज्ञायक पाटणी यांनी सर्वांचे आभार मानलेत. कार्यक्रमांचे संचलन विवेक गहानकरी सर व ईतर क्रिडा क्षेत्रातील मान्यवर यांनी केले.
ॲड. पाटणी यांनी कार्यक्रमात जमलेल्या हजारो प्रेक्षकांचे,खेळाडूंचे, सहकाऱ्यांचे आभार मानले. कारंजा शहरात संपन्न झालेले सामने आठवणीत राहतील असे झाले. सामन्याच्या यशस्वीते करीता भाजपा शहर अध्यक्ष ललित चांडक यांच्या मार्गदर्शनात विविध समित्या बनविण्यात आल्यात त्यांनी आपले काम चोख बजावले. हजारो प्रेक्षक आणि खेळाडूंची प्रचंड गर्दी सामन्यादरम्यान विद्याभारती महाविद्यालयाच्या मैदानावर जमली होती. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार आयोजकांनी मानलेत.
दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा व वाशिम जिल्हा स्पर्धा कारंजा शहरातील विद्याभारती मैदानावर संपन्न झाल्यात. प्रसार माध्यमांनी कबड्डी सामन्याचे वृत्त प्रसिध्द केले. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानण्यातआले. सामन्यास दर रोज अनेक नामांकित व्यक्तींनी भेटी दिल्यात. त्यांचा सत्कार करण्यात आला. सामन्यात प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात आलीत. विद्याभारती महाविद्यालयाच्या कर्मचारी, स्टाफचे सहकार्य लाभले.या सामन्याचे यशस्वीतेसाठी भाजपा शहर पदाधिकाऱ्यांनी उल्लेखनीय काम केले .असे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....