अकोला - अकोला राजस्थानी ब्राम्हण समाज संघटनच्या वतीने शनिवार, दि. 8 जुन 2024 रोजी मारवाडी ब्राम्हण संस्कृत विद्यालयच्या ‘‘गणपत शर्मा सभागृह’’ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान परशुरामांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरिता असलेल्या विविध व्यावसायीक वाटांविषयी माहिती दिली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये एसएससीमधील टाॅपर कु आस्था संतोष शर्मा 99.20% , कु भक्ति सुदर्शन शर्मा सीबीएसई 99%, कृष्णमूर्ति पंकज सिवाल नीट परीक्षा मे 720/720, 100% , कु हनिष्का सुनिल शर्मा बारावी बोर्ड 93% , कु. अनुश्री नवीन शर्मा, शिवम रुपेश शर्मा, लौकीक गोविंद जोशी, वेद ओमप्रकाशजी चौबे, नैतिक ब्रजकिशोर जोशी, निहाल निलेश शर्मा, कु. आनंदी रुपेश जोशी, सुमंत मनोज शर्मा, कु. पलक राजेश शर्मा, कु. ईशा गणेश शर्मा, हर्ष गजेन्द्र मिश्रा, सार्थ अनुप शर्मा, कु. खुशी मुकुटबिहारी शर्मा, युवराज अमरचंद शर्मा, कु. कनक गिरीश शर्मा, कु. कृ्ष्णा नितीन शर्मा, दर्शन सुनिल शर्मा, एचएससी मधील समर्थ राजेश शर्मा, गोविंद अनिल तिवारी, कु. भुमिका श्यामसुंदर चौबे, हर्ष प्रशांत शर्मा, कु. श्वेता चंद्रशेखर शर्मा, सोहन रितेश टिलावत, आदित्य सतीष शर्मा, कृष्णा रामचंद्र शर्मा, कु. प्राची राजेश शर्मा, कु. गुंजन गोपाल शर्मा, कु. श्रद्धा गिरधर तिवारी, कु. जुही निलेश दायमा, कु. प्रिया किशोर शर्मा, आदित्य संजय शर्मा, पार्थ शंकर शर्मा, कु. ईशा नितेश सिवाल, कृष्णा निलेश शर्मा, राजवीर कपील शर्मा, समर्थ नितीन जोशी, श्रेष्ठ नितेश पंडीत आदींचा यावेळी प्रशस्तीपत्र व स्कुल बॅग देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजस्थानी ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष विजय तिवारी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजस्थानी सेवा संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा होते तर मंचकावर प्रा. अनुप शर्मा, कमलजी हरितवाल, राकेश शर्मा, देवेंद्र तिवारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राधेश्याम शर्मा, श्याम शर्मा, राजेन्द्र तिवारी,जगदीश जोशी,विनय शर्मा, पंडित हेमंत, डाॅ सिवाल गोपाल शर्मा, मनोज औदानिया, दिपक चौबे, आनंद शास्त्री आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. शिवकुमार चौबे तर आभार प्रदर्शन देवेंद्र तिवारी यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....