घुग्घुस (चंद्रपूर) : वडीलाला चहा देण्यासाठी मुलगी गेली. मात्र खोलीतील दृश्य मुलगी हादरले. वडील फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसले. ही घटना घुग्घुस शहरातील शास्त्रीनगरात घडली. रामदास कवडू रामटेके असे मृतकाचे नाव आहे. या घटनेने शहरात खळबळी उडाली आहे.
घुग्घुस शहरातील शास्त्रीनगर येथील रामदास कवडू रामटेके (64) याने घरी कोणीच नसताना मंगळवारी रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. रामदास रामटेके याने राहते घरी दुपट्ट्याने लोखंडी पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची मुलगी चहा देण्यासाठी गेली असता घडलेला प्रकार दिसला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलिसांनी मार्ग दाखल केला असून पुढील _तपास_ ठाणेदार बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....
=================================
Post Views: 339