वर्तमान परिस्थितीमध्ये पोलीओ,कुपोषण किंवा दररोज होणाऱ्या विविध अपघातामुळे दिव्यांगाचे प्रमाण वाशिम जिल्हयात प्रत्येक खेडोपाडी गावोगावी दिवसेंदिवस वाढतच जात आहे.शिवाय निकृष्ट दर्जाचा आहार,वाढते प्रदूषण यामुळे रक्तदाब,मधुमेहाचे प्रमाणात वाढ होऊन त्यामुळे नागरिक अर्धांग वायू किंवा तत्सम आजाराचे बळी होत दुर्धर आजारग्रस्त होत आहेत.आजच्या ज्येष्ठ व वयोवृद्धांचे गुडघ्याचे आजार वाढल्याने त्यांना पायदळ चालताच येत नाही.शिवाय मतदानाकरीता जास्त वेळ रांगेत उभे रहाता येत नाही.तेव्हा प्रत्येक गावोगावी खेडोपाडी शासनाने प्रतिनिधी पाठवून वाशिम जिल्ह्यातील दिव्यांग आणि दुर्धर आजारग्रस्त,वयोवृद्ध मतदारांची, गावोगावी खेडोपाडी प्रत्येक मतदान केन्द्राची विशेष मतदार यादी तयार करून प्रत्येक मतदाराला "दिव्यांग मतदार ओळखपत्र" "दुर्धर आजार ग्रस्त मतदार ओळखपत्र" "वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक मतदार ओळखपत्र" देऊन त्यांच्या गृहमतदानाची व्यवस्था काळजीपूर्वक करायला हवी होती.परंतु 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकापूर्वी प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांना मिळालेल्या माहिती प्रमाणे काही मोजक्याच व्यक्तीचे गृहमतदान झाले आहे.मात्र मतदान केन्द्रापर्यंत ज्यांना जाताच येणार नाही.असे जिल्ह्यातील हजारो दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त आणि वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असलेले मतदार मात्र मतदान करण्यापासून वंचित राहणार आहेत. याचे कारण म्हणजे शासन प्रशासनाचा कामचुकारपणा आणि हलगर्जीपणाच म्हटले पाहिजे. कारण अशा गरजू दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, ज्येष्ठ नागरिकाच्या घरांना गृहभेटी देण्यात आलेल्या नाहीत.आणि आपल्या दफ्तरामध्ये संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी नोंदी घेतल्या नाहीत.त्यामुळे जिल्ह्यातील हजारो दिव्यांग बांधव आणि दुर्धर आजारग्रस्त तसेच वयोवृद्ध मतदार मतदानापासून वंचितच राहणार असल्याची माहिती मिळाली असल्याचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
"शासनाच्या नाकर्तेपणामुळे,कारंजा तालुक्यातील हजारो दिव्यांग आणि दुर्धर आजारग्रस्त मतदारांची शासनदफ्तरी नोंदच नसल्याचे वास्तव.परिणामी शेकडो दिव्यांग आणि दुर्धर आजारग्रस्त मतदाराचे मतदानच झालेले नाही.या संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदाराच्या गृहभेटी घेतल्या नसल्याने मतदारांना गृहमतदानाची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे दुर्धर आजारग्रस्त मतदार रहाणार गृहमतदान किंवा प्रत्यक्ष मतदानापासून वंचित.तरी या प्रकाराची सखोल चौकशी करून जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस मॅडम यांनी दखल घेऊन दिव्यांग मतदार, दुर्धर आजारग्रस्त मतदार आणि ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध मतदाराच्या वेगवेगळ्या मतदार याद्या करून संबंधितांना दिव्यांगाचे मतदार ओळखपत्र उपलब्ध करून द्यावे. अशी आमची मागणी आहे." -दिव्यांग जनसेवक संजय कडोळे.