मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होणार असल्याचे सोशल मीडिया व प्रसार माध्यमे यामध्ये बहुचर्चित दिसून येताना पाहण्यास मिळत आहे माहूर व किनवट तालुक्यामध्ये एकूण दहा जिल्हा परिषद गट असून जिल्हा परिषद उमेदवारी विचारविनिमय करून योग्य ते योग्य वेळी निर्णय घेऊन सक्रिय उमेदवार द्यावा, जनतेच्या हितासाठी व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारची आशा न बाळगता गोरगरीब जनतेची सेवा पूर्तता करण्यासाठी सक्रिय उमेदवार असणे आवश्यक आहे असे मत राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व व कला साहित्य संस्कृतीचे जिल्हा कार्याध्यक्ष निर्गुन पाटील हुडीकर यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे फार कमी वयामध्ये गोरगरीब जनतेसाठी जनतेच्या हितासाठी निराधार महिला असो आरोग्य आरोग्य विभागाच्या समस्या शैक्षणिक समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कुठल्याही वेळ प्रसंगी जनतेच्या हितासाठी धावून जाणारे राष्ट्रवादीचे पक्षाचे युवा नेतृत्व साहित्य कला संस्कृतीचे जिल्हा कार्याध्यक्ष नांदेड निर्गुन पाटील कदम हुडीकर हे तत्पर सेवेसाठी एका फोनवर हजर राहतात. राष्ट्रवादी पक्षाचा नवीन उभारता चेहरा म्हणून ओळखला जातो. अवघ्या पाच ते सहा वर्षात या कालावधी मध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करून जनसंर्पक वाढवून सर्वसामान्य जनतेची कामे करुन , पक्षाच्या अधीन राहून पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी यांच्या सानिध्यात राहून कामे करणारा व्यक्तीमत्व अशी छाप पाडली आहे. यावेळी पाटील यांनी असे सांगितले की, जर पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी यांनी आदेश दिल्यास आगामी जि.प. निवडणुक लढविण्यासाठी दर्शविली आहे