ब्रम्हपुरी तालुक्या मध्ये वाळू घाटाची संख्या तशी खूप आहे मात्र त्यामध्ये पिंपळगाव,चिखलधोकडा, आवळी , बेलगाव, कोलारी व हळदा या सहाच घाटाचे लिलाव झालेले आहे. तर या वाळुघाटा व्यतिरिक्त वाळूची वाहतूक सुरू असलेली सर्व वाळू घाट अवैध आहेत. विशेषतः भालेश्वर, सोनेगाव येथील वाळू घाटाचे लिलाव झालेले नसून या घाटातून दिवसा व रात्री सुद्धा फार मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक केल्या जात असून तालुक्यातील जास्तीत जास्त राजकिय वरदहस्त लाभलेल्या लोकांचे व त्यांच्या सबंधित लोकांचेच ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक करीत असून येथे मोठ्या प्रमाणात राजकिय सत्ताधारी आणि विरोधी पुढारी व कर्मचारी यांनी आर्थिक व्यवहार केले असल्याने हा प्रकार घडत असल्याची या भागात लोक चर्चा सुरू आहे.
काही गावात ग्रामपंचायत मुखिया सुद्धा पाच ते दहा हजार पर ट्रॅक्टर प्रेमाने एंट्री घेतं असल्याने ग्रामसदस्यांनी सुध्दा याबाबत काही हरकत न घेता आपले वाहन वाळू तस्करीसाठी वापरत असल्याचे दिसुन येत आहे. राजकिय पुढारी आपले कर्तव्य विसरत अवैध वाळू तस्करीत विणालिलाव असेलल्या वाळू घाटाचे मापदंड विसरून सर्व अटी शर्तीतून मुक्त होतं या अवैध रेती घाटाचे मालक, वाळू तस्करी करणाऱ्यांशी आर्थिक व्यवहार करीत वाळू घाटातून राजरोसपणे "सुपर एन्ट्री" च्या नावावर वीना रॉयल्टी अवैध वाळू वाहतूक करीत असून त्यामुळे तालुक्यातील रस्त्याची मोठी दैनावस्था झाली असून शासनाच्या महसुलाची खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे.
दहा जून पर्यंत लिलाव झालेल्या वाळू घाटाची मुदत संपत असतांना सुद्धा रेती तस्करांवर कुठलेच प्रतिबंध तालुक्यात दिसून नं येता अविरत सर्वत्र वाळू तस्करीचा थैमान सुरु आहे. वाळू तस्करीचा प्रकार सर्वांच्या डोळ्या समोर घडत असताना सुद्धा यावर कारवाई बाबत कोणतेही सत्ताधारी अथवा विरोधी राजकिय पुढारी आवाज उठवत नसल्याने या वाळू माफियांच्या टोळीला राजकीय "हात" मिळत असल्याचे तालुक्यात स्पष्ट दिसून येत आहे.