तालुक्यातील केंद्र जोगीसाखरा अंतर्भूत जि. प.प्रा.मराठी शाळा रामपूर येथे भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुमदेव सहारे यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच ध्वजारोहण वेळी ग्रा.प.कासवीचे उपसरपंच प्रवीण ठेंगरी,पोलीस पाटील सौ.कामिनीताई राऊत,ग्रापस सौ रेखा राऊत, ग्रापस सौ पूजा गुरनुले, श्री देवराव प्रधान,भाऊराव प्रधान,हरिश्चंद्र खरकाटे,धनंजय बांडे, शा. व्य. स.सदस्य लालाजी बावणे,अशोक मोहूर्ले, सौ.कीर्ती ढोरे,स्नेहा सरपे, व गावकरी,युवक उपस्थित होते.
ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी संचालन मुख्याध्यापक वाटगुरे व आभार सहाय्यक शिक्षक गुळदे यांनी केले.