कारंजा (लाड) -- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी कारंजा लाड शहर व तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी, शहर कॉग्रेसचे पदाधिकारी,युवक काँग्रेस,एन.एस यु आय,महिला काँग्रेस,काँग्रेस सेवादल, अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी, ओ.बी.सी काँग्रेस,व्हिजेएनटी काँग्रेस,सर्कल प्रमुख,बी.एल.ए यांनी सभेला वेळेवर आवर्जुन उपस्थित रहावे ह्या सभेचे अध्यक्षस्थानी देवानंदभाऊ पवार,सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व प्रभारी वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी राहणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती दिलीप भोजराज सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि अन्य जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी पदाधिकारी असणार आहेत. महत्वाचे म्हणजे यावेळी होणाऱ्या या सभेत कारंजा शहर व तालुक्यातील नवनियुक्त जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सभादि.सोमवार, 01 एप्रिल 2024 रोजी वेळ सकाळी 10.30 वा. स्थळ : हाॅटेल सिमरन
झाॅशी राणी चौक,बायपास, मंगरूळपीर रोड,
कारंजा (लाड ) येथे होणार असल्याची माहिती मिळाली आहे.