अकोला:- स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व श्री शिवाजी महाविद्यालय अकोला च्या संयुक्त विद्यमाने ४ जानेवारी २०२५ रोजी जागतिक ब्रेल दिन संपन्न झाला. वसंत सभागृह शिवाजी महाविद्यालय अकोला येथे झालेल्या या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना पांढरी काठी, ब्रेल बुक्स व दिव्यांग महिलांना साडीचे वितरण करण्यात आले.
संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कार्यक्रमात ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांचा जयंती उत्सव, दिव्यांगांना साहित्याचे वितरण व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चा सदस्य स्व.रोहित सूर्यवंशी याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे, प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य डॉ.सुभाष भडांगे,श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती चे आजीवन सदस्य रामेश्वर वाकडे,दादाराव सोनोने, डॉ.नानासाहेब वानखेडे, संस्थेचे सहसचिव डॉ.संजय तिडके, डॉ.विशाल कोरडे आणि श्रीमती रश्मी सुर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ .विशाल कोरडे यांनी ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या विषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला या संस्थेने समाजात केलेल्या सामाजिक कार्याचा गोषवारा दिला.समाज कल्याण विभागाद्वारा संस्थेला आदर्श संस्था पुरस्कार प्राप्त झाला असून भारतासोबतच सात देशात संस्थेचे कार्य अव्याहत सुरू असल्याची माहिती दिली*. डॉ सुभाष भडांगे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. श्री दादाराव सोनोने यांनी दिव्यांग बांधवांसाठी प्रेरणादायक उपक्रमात समाजाने सहभाग नोंदवावा व दिव्यांग सोशल फाउंडेशन चे सदस्य व्हावे असे आव्हान केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ.रामेश्वर भिसे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व श्री शिवाजी महाविद्यालय अकोला च्या माध्यमाने समाजात दिव्यांगांच्या शिक्षणासाठी डॉ.कोरडे करीत असलेल्या कार्याबद्दल यांचे कौतुक केले.सदर कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थी मोहम्मद नाझील, कुणाल यादव व अस्मिता मिश्रा यांनी मनोगत व आभार व्यक्त केले.संस्थे तर्फे ४ वर्षीय अक्षरा अलोट मुकबधीर बालिकेचे पालकत्व स्वीकारले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनामिका देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.विशाल कोरडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश सोळंके, तन्वी दळवे, डॉ.सोपान वतारे,नयना लवंगे,दिपमाला दोरकर व विजय कोरडे यांनी सहकार्य केले.