महात्मा गांधी कला, विज्ञान आणि स्व. न. प. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथील सहाय्यक प्राध्यापक वैभव प्रभाकर पडोळे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर कडून इंग्रजी विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसफी (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
वैभव पडोळे यांनी आपले संशोधन डॉ. कपिल आर. सिंघेल यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. त्यांच्या प्रबंधाचे शीर्षक "लिटररी रिजिनालीज्म इन द नॉव्हेल्स ऑफ अनिता नायर" (Literary Regionalism in the Novels of Anita Nair) असे आहे, ज्यामध्ये त्यांनी प्रख्यात भारतीय लेखिका अनिता नायर यांच्या साहित्यामधील सांस्कृतिक व प्रादेशिक विशेषतांचा सखोल अभ्यास केला आहे.
ही पदवी त्यांना ८ एप्रिल २०२५ रोजी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सहकारी, विद्यार्थी आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.