तालुक्यातील खांबाडा येथील भोयर कन्फेक्शनरी ,नक्षीने इन्फेक्शनरी यांच्या दुकानातून सहा लाख रुपयाचा सुगंधी तंबाखू जप्त केला ही कारवाही काल दुपारी 3ते4 च्या सुमारास ठाणेदार याच्या संबंधात कारवाई करन्यात आली
बऱ्याच वर्षापासून खांबाडा परिसरात हिंगणघाट येथून सुगंधी तंबाखू आणल्या जात असल्याची खबर पोलिसांजवळ होती. मात्र पोलीस यांच्या पर्यंत पोहचू शकले नाही अश्यातच नव्याने रुजू झालेले परी. पो. अधीक्षक योगेश रांजणकर यानी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून खांबाडा परिसरातील घरात साठवून ठेवलेला प्रतिबंधित सुगंधी तंबाखू जप्त केला. अवैध प्रतिबंधित सुगंधी तंबाखू तीन ठिकाणावरून जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दुकानदार विलास भोयर ,नक्षीने, वांढरे यांना वरोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
मागील कित्येक वर्षापासून हा व्यवसाय वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.याचे वरोरा, खांबाडा ,माढेळी हे प्रमुख केंद्र असून याची माहिती पोलीस विभागाला का नसावी हे ही एक कोडे आहे. कॉलेज, शाळा , हॉस्पिटल, मंदिरे यांच्याजवळ खुल्या प्रमाणात बिनधास्तपणे गुटखा, खर्रा, सुगंधित तंबाखू विक्री करीत असताना दिसत आहे. मात्र आतापर्यंत कारवाई दिसून आली नाही.
मात्र नवीन प्रभारी पोलीस अधीक्षक योगेश रांजणकर यांची नियुक्ती झाल्यावर सहा लाखाचा सुगंधित तंबाखू पोलिसांनी कारवाही झाल्याने पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन खांबाडा गावातील नागरिक हे करीत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात सट्टा व्यवसाय याला सुगीचे दिवस आलेले आहेत या सट्टा व्यवसायात गुंतलेले अनेक जण राजरोसपणे पोलिसांचा आपल्यावर असलेला आशीर्वाद अशा पद्धतीने हा अवैध व्यवसाय सुरू आहे, आत्ता पावेतो सहा महिन्यात पोलिसांनी केवळ 64 लोकांवर कारवाई केल्याचे दिसून येत आहे मात्र शहरातच 80 ते 90 सट्टा चालक कार्यरत असून खेड्यातही मोठ्या प्रमाणात याचा शिरकाव झालेला आहे या सट्टा व्यवसायावर याच पद्धतीने येथील सट्टा बाजार बंद करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत